Ferry Boat Repair: फेरीबोटींवर 35 कोटींपेक्षा अधिक खर्च! आकडेवारीत विसंगती असल्याचा दावा; युरी-फळदेसाई यांच्यात जुंपली

Ferry Boat Repair Goa: फेरीबोटींच्‍या दुरुस्‍तीवर नदी परिवहन खात्‍याने गेल्‍या सहा वर्षांत केलेल्‍या कोट्यवधीच्‍या खर्चावरून विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मंत्री सुभाष फळदेसाई यांना सभागृहात घेरले.
Yuri Alemao, Subhash Phaldesai
Yuri Alemao, Subhash PhaldesaiDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: फेरीबोटींच्‍या दुरुस्‍तीवर नदी परिवहन खात्‍याने गेल्‍या सहा वर्षांत केलेल्‍या कोट्यवधीच्‍या खर्चावरून विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मंत्री सुभाष फळदेसाई यांना सोमवारी सभागृहात घेरले.

गेल्‍या सहा वर्षांत फेरीबोटींवर सरकारने ३५ कोटींपेक्षा अधिक खर्च केलेला आहे. त्‍यातील काही बोटींवर एक कोटींपेक्षाही अधिक खर्च करण्‍यात आला आहे. सोलर इलेक्‍ट्रीक बोट अजूनही सुरू करण्‍यात आलेली नाही.

नदी परिवहन खात्‍याने याबाबत दिलेल्‍या आकडेवारीत विसंगती असल्‍याचा दावा त्‍यांनी केला. मांडवी नदीतील फेरीबोटी ‘स्‍मार्ट’ झाल्‍या. पण, राजधानी पणजी मात्र अजूनही ‘स्‍मार्ट’ झाली नाही, असे म्‍हणत त्‍यांनी सरकारवर हल्लाबोल चढवला.

Yuri Alemao, Subhash Phaldesai
Ro Ro Ferryboat: रो-रो फेरीबोटीचा वेगाचा ‘रेकॉर्ड’! प्रवाशांची प्रचंड गर्दी; बघ्यांची 'संख्या' वाढली

दरम्‍यान, युरी आलेमाव यांच्‍या प्रश्‍नाला उत्तर देताना, सध्‍या राज्‍यातील १८ जलमार्गांवर ३२ फेरीबोटी कार्यरत आहेत.

Yuri Alemao, Subhash Phaldesai
Ro Ro Ferryboat: मुरगाव-दोना पावला 'रो-रो फेरी' सुरू करा! आमदार साळकर, आमोणकर यांची मागणी

३२ फेरीतील अनेक फेरीबोटी १५ ते २० वर्षे जुन्या असून, त्‍यात दररोज सुमारे १८ तास धावतात. त्‍यांच्‍या वापरासाठी देखभालीची आवश्यकता असते. त्‍याच्‍या परिस्‍थितीवरून त्‍यांची दुरुस्‍ती केली जात असल्‍याने कधीकधी दुरुस्‍तीचा खर्च वाढतो, असे त्‍यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com