
पणजी: मुरगाव ते दोना पावला ही फेरीबोट चालू होती, आता सर्वत्र रो-रो फेरीबोट घातली जात आहे. यापूर्वी येथे फेरीबोट सेवा सुरू होती, ती बंद झाली. वॉटर टॅक्सीवर पंतप्रधानांकडून भर दिला जात आहे. महामार्ग झाले तरी वाहतूक कोंडी होत आहे. पुढील काळात वॉटर टॅक्सीच्या सेवेचा वापर अधिक होईल.
त्यामुळे वास्कोतून पणजीला यायचे झाल्यास हजार रुपयांचे इंधन लागते. याचा विचार करून मुरगाव-दोना पावला रो-रो फेरीबोट सेवा सुरू करावी, अशी मागणी मुरगाव तालुक्यातील आमदार दाजी साळकर आणि आमदार संकल्प आमोणकर यांनी केली.
पुरातत्व विभाग, नदी परिहवन (अंतर्गत जलमार्ग), समाजकल्याण आणि दिव्यांग कल्याण खात्यांवरील मागण्यांवर व कट मोशनला विरोध करताना ते बोलत होते.
साळकर म्हणाले, मुरगाव-दोनापावला ही सेवा गरजेची आहे. सार्वजनिक सेवा सुरू झाल्यास खासगी वाहनांचा वापरही कमी होईल. यापूर्वी मुरगाव ते दोना पावला सी-लिंक पुलाचा प्रस्ताव होता. निधी अभावी हा प्रकल्प रखड़ला. परंतु वॉटर टॅक्सीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवून तो पायलट प्रकल्प म्हणून घेता येऊ शकतो.
भूखंड बळकावप्रकरण घडल्याने सरकारी रेकॉर्डचे डिजिटायझेशन करणे आवश्यक आहे. जे काम हळुवार चालू आहे, ते गतीने करावे. निधी हवा असेल तर मंत्र्यांनी सरकारकडे तो प्रस्ताव पाठवावा. ज्येष्ठ नागरिकांसाठी चार ते पाच तारखेपर्यंत दोन हजार रुपये दिले जातात, ती रक्कम अडीच हजार रुपये करावेत. डीएसएस योजनेतून बोगस लाभार्थींचे ६० कोटी रुपये परत आणल्याबद्दल मंत्र्यांचे अभिनंदन,असेही साळकर म्हणाले.
चोडण-रायबंदर या मार्गावर रो-रो फेरीबोट सेवा सुरू केली आहे. त्यानुसार आता मुरगाव ते दोना पावला मार्गावर रो-रो फेरीबोट सेवा सुरू करावी, त्यामुळे पर्यटनही वाढेल. मुरगाव येथे पोर्टवर नवा टर्मिनल येणार आहे, त्यामुळे या जलमार्गावर रो-रो फेरीबोट सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे, असे संकल्प आमोणकर यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.