Yuri Alemao: भाजप सरकारच्या निष्काळजीपणामुळे मुरगाव तालुक्‍याचा बॉम्ब बनलाय; कधीही फुटू शकतो...

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी व्यक्त केली भीती; ऑईल टँकींग कंपनीला कठोर दंड करण्याची मागणी
Yuri Alemao
Yuri Alemao Dainik Gomantak

Yuri Alemao: दाबोळी येथिल विहीरी, नाले आणि शेत जमीन पेट्रोलियम पदार्थानी दूषित होण्याचे नेमके कारण शोधण्यात सरकारच्या अपयशाने पुन्हा एकदा गोव्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आपत्तीजनक परिस्थितीचा पर्दाफाश झाला आहे.

भाजप सरकारच्या निष्काळजी वृत्तीमुळे संपूर्ण मुरगाव तालुक्याचे टिकींग बॉम्ब बनले आहे, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला आहे.

दाबोळीत विहीरीचे पाणी दुषीत झाल्याचे आढळल्यास आता एका आठवड्यापेक्षा जास्त दिवस झाले आहेत.

परंतू प्रदूषणाचे नेमके कारण शोधण्यात सरकार पूर्णपणे असमर्थ ठरले आहे. पेट्रोलियम पदार्थाची गळती शोधण्यासाठी अधिकारी दोषी झुआरी इंडियन ऑइल टँकिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवरच अवलंबून आहेत हे दु्र्देवी व धक्कादायक आहे.

भूजल, शेतजमीन नष्ट करणे आणि मानवी जीवनास धोका निर्माण करणे यासाठी सदर कंपनीवर कठोर दंड ठोठावला पाहिजे, अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली.

Yuri Alemao
Goa Government Hotels: स्वस्तात गोवा ट्रिप करायचीय? मग 'या' सरकारी हॉटेल्समध्ये करा बुकिंग

यापूर्वी मुरगाव तालुक्यात असलेल्या बड्या उद्योगांमध्ये हानिकारक वायूंची गळती, स्फोटांमुळे कामगारांचा मृत्यू आणि इतर अनेक घटना आपण अनुभवल्या आहेत.

सरकारच्या बेजबाबदार आणि असंवेदनशील वृत्तीमुळेच या उद्योगांनी अजूनही योग्य धडा घेतला नाही आणि लोकांच्या जीवाशी खेळ सुरूच ठेवला आहे.

आता कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आणि लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची वेळ आली आहे, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.

गोवा विधानसभेच्या मार्च महिन्यातील अधिवेशनात सरकारने गोवा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण हे आपत्ती व्यवस्थापनात लागणाऱ्या मुख्य सामग्रीसाठी व इतर मदतीसाठी गोवा शिपयार्ड लि., मुरगाव बंदर प्राधिकरण, भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल आणि इतर खाजगी उद्योगांवर अवलंबून असल्याची माहिती मला दिली होती.

यापैकी बहुतेक कंपन्या या मुरगाव तालुक्यातच असल्याचा दावा युरी आलेमाव यांनी केला आहे.

सरकारने नमूद केलेल्या जवळपास सर्वच कंपन्या आणि एजन्सी दाबोळीच्या नागरी व नौदल विमानतळाच्या 5 किलोमीटर परिघात आणि वास्को शहराच्या मध्यभागी तसेच झुआरी नगर येथील टेकडीवर असलेल्या पेट्रोलियम साठा करणाऱ्या टाक्यांसारख्या अती- जोखमीच्या स्थानकांनी वेढलेल्या आहेत.

एखादी आपत्ती झाल्यास संपूर्ण मुरगाव तालुकाच टिकिंग बॉम्ब बनेल आणि सरकारची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा बनेल, असा इशारा दिला होता, याची आठवण युरी आलेमाव यांनी करुन दिली.

पेट्रोलियम उत्पादनांनी विहीर, नाले आणि शेत जमिनी दूषित होणे ही सरकारसाठी धोक्याची घंटा आहे, असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

Yuri Alemao
आता समुद्रातील तरंगत्या ऑफिसमधून करा 'वर्क फ्रॉम गोवा'; 5G नेटवर्कसह विविध सुविधा पुरवणार

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तातडीने सर्व संबंधितांची बैठक बोलावून दाबोळीच्या रहिवाशांना भेडसावणाऱ्या पाणी दूषित समस्येचे निराकरण करावे.

राज्यातील आपत्ती व्यवस्थापन हाताळण्यासाठी उपकरणे आणि संसाधने तसेच मनुष्यबळाची नियुक्ती करण्यासाठी सरकारने केवळ मुरगाव तालुक्यावर विसंबून न राहता, राज्यभरातील महत्वपूर्ण ठिकाणे शोधून काढावीत अशी माझी मागणी आहे.

सरकारने कार्यक्रमांवर पैसे खर्च करणे थांबवून आपत्ती व्यवस्थापनातील अद्ययावत उपकरणे मिळविण्यासाठी सदर निधीचा वापर केला पाहिजे, अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com