Goa Congress : काँग्रेस विधिमंडळ गट नेतेपदी युरी आलेमाव यांची वर्णी शक्य

दिल्लीमध्ये लॉबिंग सुरू : चतुर्थीपूर्वी नेतेपद होणार निश्चित
Yuri Alemao Congress
Yuri Alemao CongressDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Congress : गेल्या दीड महिन्यापासून रिक्त असलेल्या काँग्रेस विधिमंडळ गट नेतेपदासाठी सध्या दिल्लीत जोरदार लॉबिंग सुरू आहे. अनेक आमदार आणि त्यांच्या गटातील नेत्यांनी पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन आपली बाजू मांडली. तर, गणेश चतुर्थीपूर्वी नेतेपद निश्चित होणार असल्याचे संकेत मिळत असून, कुंकळ्ळीचे आमदार तथा कार्याध्यक्ष युरी आलेमाव यांच्या गळ्यात माळ पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पक्षात सध्या गटबाजी सुरू असून, बऱ्याच दिवसांपासून काँग्रेसच्या नेत्यांची दिल्लीवारी सुरू आहे. विद्यमान आणि माजी प्रदेशाध्यक्ष असे दोन गट पक्षात सक्रिय असून, अमित पाटकर यांच्या गटाकडून युरी आलेमाव आणि ॲड. कार्लुस फेरेरा, तर गिरीश चोडणकर यांच्या गटाकडून संकल्प आमोणकर यांचे नाव पुढे केले जात आहे.

अमित पाटकर हे नवखे असले तरी राजकारणाची त्यांना बऱ्यापैकी समज आहे. संघटनेवर आपले माणूस आणण्यासाठी पाटकर यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील पक्षाच्या समित्या विसर्जित करून त्या नव्याने पुनर्गठित करण्याची मागणी पाटकर यांनी केली आहे. तसेच आपल्याजवळचा आमदार विधिमंडळ गटाचा नेता झाल्यास समन्वय करण्यास योग्य होईल, यासाठी युरी आलेमाव आणि ॲड. कार्लुस फेरेरा यांची नावे त्यांच्याकडून पुढे केली गेली आहेत. त्यात युरी हे युवा आणि पक्षाशी निष्ठावंत असल्याने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Yuri Alemao Congress
Ganesh Chaturthi : आतुरता बाप्पाच्या आगमनाची; घुमट, समेळाचा घुमतोय नाद

चोडणकर प्रदेशाध्यक्ष पदासाठी सक्रिय

हल्ली गिरीश चोडणकर बऱ्यापैकी सक्रिय झाले आहेत. पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्ष पद मिळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सध्या पक्षाच्या गोटात सुरू आहे. त्यासाठी आमोणकर यांना गटनेतेपद मिळावे यासाठी ते प्रयत्नशील आहेत. चोडणकर प्रदेशाध्यक्ष असताना आमोणकर हे उपाध्यक्ष होते. दोघांनाही पक्ष संघटनेवरील पकड सोडायची नाही. त्यामुळे मायकल लोबो यांची हकालपट्टी झाल्यापासून चोडणकर यांनी आपले प्रयत्न वाढवले आहेत.

काँग्रेस गटनेतेपदी कोणाची निवड होणार याचा निर्णय पक्षश्रेष्ठींकडून घेतला जाईल. सध्या सगळे आमदार एकसंघ असून, कोणाचीही निवड झाल्यास समस्या नाही. दिल्लीत कोण गेले, हे मला माहीत नाही. पक्षश्रेष्ठी योग्य निर्णय घेतील, अशी आशा आहे, अशी माहिती आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com