1583 च्या लढ्याचा शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश होणे आवश्यक - युरी आलेमाव

पोर्तुगीजांच्या वसाहतवादाविरोधात बंड पुकारलेल्या सर्व हुतात्म्यांना आलेमाव यांनी केले अभिवादन
1583 च्या लढ्याचा शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश होणे आवश्यक - युरी आलेमाव
Published on
Updated on

मडगाव: कुंकळ्ळीतील शुर नागरीकांनी 15 जुलै रोजी उभारलेला लढा हा भारतातील वसाहतवादी शक्तींविरोधातील पहिला लढा होता. सरकारने आता 15 जूलै 1583 चा लढा शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा यासाठी कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी गोवा विधानसभेच्या आगामी अधिवेशनात खासगी ठराव मांडणार आहे. ( Yuri Alemao greets all martyrs who revolted against Portuguese )

सभापतींनी हा ठराव दाखल करुन घेतल्यास उठावाच्या स्मरण दिनीच म्हणजे 15 जूलै रोजी विधानसभेत चर्चेस येणार असुन, देशातील पहिला उठाव तथा असहकार चळवळीचे स्मरण करुन देणार आहे. योगायोगाने 15 जूलै हा दिवस सरकारने गोवा राज्याचा युद्ध स्मारक दिवस म्हणून घोषीत केला आहे.

1583 च्या लढ्याचा शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश होणे आवश्यक - युरी आलेमाव
डॉम्निक डिसोझाला वाहतूक खात्याचा दणका

कुंकळ्ळीचा लोकप्रतिनीधी म्हणुन दिल्लीतील युद्ध स्मारकाकडे आयोजित सरकारी कार्यक्रमात उपस्थित राहण्याची माजी इच्छा होती, परंतु विधानसभा अधिवेशनाच्या कामकाजामुळे मला प्रत्यक्षात तेथे हजर राहणे शक्य होणार नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व इतर सर्व सहकारी आमदारांनी हा ठराव एकमताने संमत करण्यास पाठींबा द्यावा असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

1583 च्या लढ्याचा शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश होणे आवश्यक - युरी आलेमाव
'राजेंद्र आर्लेकरांनी मुख्यमंत्री सावंतांना खर्च कपातीसाठी प्रशिक्षण घेण्याचा सल्ला द्यावा'

पोर्तुगीजांच्या वसाहतवादाविरोधात बंड पुकारलेल्या सर्व हुतात्म्यांना अभिवादन करत आलेमाव म्हणाले की, पोर्तुगीजांकडे कर भरण्यास नकार देणारे व असहकार चळवळ उभारणारे स्वाभिमानी कुंकळ्ळीकरांचा मला अभिमान आहे. या ऐतिहासिक मतदारसंघाचा आमदार म्हणुन प्रतिनिधीत्व करण्याचे मला भाग्य लाभल्याचे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

कुंकळ्ळीतील तसेच इतर अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीविरोधात लढताना आपले सर्वस्व दिले आहे. त्या सर्वांचे स्मरण करणे हे आमचे कर्तव्य आहे. कुंकळ्ळीतील चीफटेन्स मेमोरीयल तसेच इतर स्मारकांची डागडुजी व सौंदर्यीकरणाचे काम त्वरीत हाती घेण्याची मागणी आपण करणार आहे. पुरातत्व खात्याकडे वास्तुविशारद हेसिंतो पिंटो यांनी 22 मार्च 2021 रोजी सादर केलेल्या अहवालावर सरकारने त्वरित कारवाई करणे गरजेचे आहे. यावर विधानसभेत लक्ष ओढणार असल्याचे युरी आलेमाव यांनी सांगितले.

तसेच पुढे बोलताना आलेमाव म्हणाले की, आज गोव्यातील अनेक हुतात्मा स्मारके व ऐतिहासिक स्थळे अत्यंत दयनिय स्थितीत असून, त्यांची तातडीने डागडुजी व देखभाल करणे गरजेचे आहे. गोवा मुक्तीलढ्याशी संबंधीत सर्व स्थळांची यादी करुन ती ऐतिहासीक स्थळे म्हणून अधिसुचीत करण्याची मागणी करणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com