

पणजी: राज्य विधानसभा संकुलाच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सरकारवर केलेल्या विविध टीकांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. गोवा मुक्तीनंतर सुरुवातीच्या काळात दोन वित्त आयोगांचा निधी राज्याला मिळाला नसल्याने विकास रखडल्याचा दावा करीत, भाजपच्या ‘डबल इंजिन’ सरकारने राज्याचा सर्वांगीण विकास साधल्याचे त्यांनी सांगितले.
युरी आलेमाव यांनी गोव्यातील जमीन, ‘कॅरिंग कपॅसिटी’, पर्यावरणाचा ऱ्हास तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या मुद्यावरून सरकारवर टीका केली होती. त्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर १४ वर्षांनी गोवा मुक्त झाला. या काळातील दोन वित्त आयोगांचा निधी न मिळाल्याने गोव्याची विकास प्रक्रिया रखडली. मात्र, भाजपचे ‘डबल इंजिन’ सरकार आल्यानंतर प्रगतीचा आलेख चढत गेला. जनमत कौलावेळी गोमंतकीय जनतेने वेगळा निर्णय घेतला असता, तर गोवा महाराष्ट्रात विलीन झाला असता.
‘त्या’ घटनेची इतिहास नोंद ठेवेल : युरी
सरकारला प्रश्न विचारणे, जनतेच्या समस्या मांडणे आणि त्यावर तोडगा काढण्याची जबाबदारी विरोधकांची आहे. सत्ताधारी पक्षाविरोधात ६६ टक्के लोक मतदान करीत असल्याने विरोधकांची भूमिका महत्त्वाची आहे, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.
निवडणूक वर्षातील अर्थसंकल्पीय अधिवेशन मध्येच स्थगित करण्याची घटना धक्कादायक होती. असा प्रकार गोव्यातच घडू शकतो. इतिहास या घटनेची नोंद ठेवेल, असेही त्यांनी नमूद केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.