Goa Politics: 'गोव्यात हुकूमशाही अन् जंगल राज'! LOP आलेमाव यांचा घणाघात; ‘संविधान बचाव अभियाना'त डिचोलीत जागृती

Yuri Alemao: सरकारचा भ्रष्ट आणि हुकूमशाही कारभार पाहता, आगामी निवडणुकीत भाजप सत्ताभ्रष्ट होणार, अशी टीका युरी आलेमाव यांनी करून डिचोलीतील खाण आदी बेकायदा गोष्टींविरोधात आवाज काढणार, अशी ग्वाही दिली.
Yuri Alemao On BJP
Yuri Alemao On BJPDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: गोव्यात भाजप सरकारची हुकूमशाही अर्थातच ‘जंगल राज’ चालू आहे. सरकारच्या आशीर्वादाने गोवा हे ड्रग्ज आदी गैरधंद्यासाठी प्रमुख केंद्र बनले आहे. शेतकऱ्यांसह खाण अवलंबितांना या सरकारने रस्त्यावर आणले आहे.

सरकारचा भ्रष्ट आणि हुकूमशाही कारभार पाहता, आगामी निवडणुकीत भाजप सत्ताभ्रष्ट होणार, अशी टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी करून डिचोलीतील खाण आदी बेकायदा गोष्टींविरोधात आवाज काढणार, अशी ग्वाही दिली.

काँग्रेसच्या ‘संविधान बचाव अभियान’ अंतर्गत डिचोलीत आयोजित कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. विकसित गोव्याची स्वप्नपूर्ती सोडाच, उलट भाजपमुळेच काही वर्षांत गोव्याचे अस्तित्व नष्ट होणार, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. शनिवारी येथील ‘आयडीसी’ सभागृहात आयोजित या कार्यक्रमास गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर आणि दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस उपस्थित होते.

अमित पाटकर यांनी भाजप सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा पाढाच वाचला. विकासाच्या नावाखाली भाजप सरकारने गोवा विकायला काढला आहे, असा आरोपही त्यांनी केला. पुढील पिढीच्या सुरक्षतेसाठी भाजप सरकारला घरी बसविण्याची आता वेळ आली आहे, असे विरियातो फर्नांडिस म्हणाले.

Yuri Alemao On BJP
Goa Politics: 40 आमदारांत ‘मगो’ असेल की नाही, हे जनताच ठरवेल! ‘मगो’ समर्थकांचा हल्लाबोल; सरदेसाईंच्या विधानाचा निषेध

खाणविषय पुन्हा तापला

या जागृती कार्यक्रमावेळी प्रामुख्याने डिचोली आणि मये मतदारसंघातील जनता उपस्थित होती. यावेळी काहीजणांनी आपापल्या भागातील समस्या मांडून भाजप सरकार सतावणुकीचे राजकारण करीत असल्याचा आरोप केला. त्यामुळे खाण विषय तापला. खाणी सुरु झाल्या, मात्र कामगार रस्त्यावर आले आहेत. या कामगारांना कोणीच वाली नाही, अशी व्यथा रघुनाथ जल्मी यांनी मांडली.

Yuri Alemao On BJP
Goa Politics: भरत परब हे मनोज परबांचे वडील असल्याचा खोटा दावा, बनावट व्हिडिओविरोधात RGP कडून तक्रार दाखल

डिचोलीत जमीन आदी घोटाळे वाढले आहेत, अशी टीका मेघ:श्याम राऊत यांनी करून यापुढे जनता रस्त्यावर उतरण्यास मागे राहणार नाही, असा इशारा दिला. सुधाकर वायंगणकर, नागेश नाईक यांनी खाण व्यवसायामुळे शेती कशा उद्‍ध्वस्त झाल्याची समस्या मांडली. नंदा सावळ, सौ. राऊत आदींनीही प्रश्न मांडले. यावेळी काँग्रेसची महिला अध्यक्ष प्रतीक्षा खलप, डिचोली आणि मये गट काँग्रेसचे अध्यक्ष दत्ताराम शेट्ये आणि राजेश गावकर, प्रदेश काँग्रेसचे नझीर बेग, ॲड. अजय प्रभुगावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com