Gautam Khattar: गौतम खट्टरला आज गोव्यात आणणार, पोलिस चौकशीत सत्य उघड होण्याची शक्यता; आयोजकांचीही होणार चौकशी

YouTuber Gautam Khattar arrested: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याविषयी प्रक्षोभक विधान केल्याप्रकरणी हिमाचल प्रदेशात अटक करण्यात आलेला मुख्य संशयित यूट्युबर गौतम खट्टर याला रविवारी गोव्यात आणण्यात येणार आहे.
YouTuber Gautam Khattar arrested
YouTuber Gautam Khattar arrestedDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याविषयी प्रक्षोभक विधान केल्याप्रकरणी हिमाचल प्रदेशात अटक करण्यात आलेला मुख्य संशयित यूट्युबर गौतम खट्टर याला रविवारी गोव्यात आणण्यात येणार आहे.

गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याचा ताबा घेतला आहे. त्यामुळे रविवारी त्याला राज्यात आणल्यावर होणाऱ्या चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शुक्रवारी संध्याकाळी हिमाचल प्रदेशातील कुलू जिल्ह्यात स्थानिक पोलिसांनी गौतम खट्टरला ताब्यात घेतले होते.

YouTuber Gautam Khattar arrested
Goa Fishing Industry: मच्छीमारी व्यवसाय संकटात! परप्रांतीय ट्रॉलर्सचा धुडगूस सुरूच; कारवाईत हवे सातत्‍य

गौतमचा भाऊ माधव खट्टर याला आधीच पोलिसांनी हरिद्वार येथून अटक केली असून तो सध्या पोलिस कोठडीत आहे. गौतम याच्या वादग्रस्त भाषणाचे लेखन माधवनेच केले होते आणि सोशल मीडियावरही ते व्हायरल करण्यात माधव याची मोठी भूमिका असल्याने त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ५१ हजार रुपये आणि विमान तिकिटांची मागणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गोव्यात दाखल होताच त्याला न्यायालयात हजर केले जाईल आणि सविस्तर चौकशीसाठी पोलिस कोठडीची मागणी केली जाईल.

YouTuber Gautam Khattar arrested
Cycling Association of Goa: सायकलिंग असोसिएशनला कोर्टाचा झटका! 66 जणांचे सदस्यत्व वैध; 'मतदार वाढतील' हे कारण ठरले आक्षेपार्ह

खट्टर बंधूंचा बोलविता धनी कोण?

राज्यात धार्मिक सलोखा बिघडविण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न होता का आणि कोणा मोठ्या शक्तीचा यात हात आहे का, हे आता गुन्हे शाखेच्या तपासात स्पष्ट होईल. दोघा खट्टर बंधूंच्या चौकशीनंतर या प्रकरणातील मुख्य सूत्रधार कोण, याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com