Water Dispute: पेडणे तालुक्यात तीव्र पाणी समस्या

आरजीची अभियंत्याशी चर्चा ः सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक सहकार्य करणार
Water Dispute
Water DisputeDainik Gomantak

पेडणे तालुक्यातील विविध भागांत जाणवणाऱ्या पाणी समस्येसंबंधी शुक्रवारी (ता. 10) रिव्होल्युशनरी गोवाचे प्रमुख मनोज परब यांनी पाणीपुरवठा कार्यालयात जाऊन सहाय्यक अभियंते सोमा नाईक व कनिष्ठ अभियंते गौरिश ठाकूर यांच्याशी चर्चा केली व निवेदन सादर केले.

पाणीपुरवठा कार्यालय, जलसिंचन खाते, शहर व नगरनियोजन खाते, ग्रामपंचायत व नागरिक यांची एक संयुक्त बैठक बोलावून चर्चा करावी व पाण्याच्या समस्येवर उपाययोजना करण्याची सूचना केली.

अभियंते श्री. नाईक व श्री. ठाकूर यांच्याशी चर्चा करताना मनोज परब म्हणाले की किनारी भागात मोठमोठी बीच रिसॉर्ट आहेत. अशा हॉटेलना मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. पाणीपुरवठा करणाऱ्या चांदेल येथील जल प्रकल्पाची क्षमता कमी आहे.

त्यावर अभियंते ठाकूर म्हणाले कि, बार रेस्टॉरंट वगळता आम्ही कुठल्याही अशा मोठ्या हॉटेलना पाण्याच्या जोडण्या दिलेल्या नाहीत.

परब म्हणाले, मानशीवाडा-कोरगाव येथे नळाला खारे पाणी येत आहे. तसेच माईण-कोरगाव येथे सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. उगवे येथे वेळेवर पाणीपुरवठा होत नाही मात्र मोठी बिले येतात. वाहिन्यांंना गंज आल्याने अशुद्ध पाणीपुरवठा होतो. यामुळे लोकांनी कंटाळून नळाच्या जोडण्या काढून टाकल्या आहेत.

पेडण्यात विकासाच्या नावावर पेडणेचा विध्वंस करणारे मोठमोठे प्रक्ल्प येत असल्याने लोकांच्या वाट्याचे हक्काचे पाणी या प्रकल्पाना दिले जाऊ शकते. त्यासाठी पाणीपुरवठा खात्याची भूमिका महत्त्वपूर्ण रहाणार आहे. तसेच लोकांनी जागरूक रहाणे आवश्यक आहे.

Water Dispute
Goa Shigmotsav : सत्तरीत वैशिष्ट्यपूर्ण करवल्या उत्सव थाटात

पाणी पुनर्वापर प्रकल्प प्रभावी ठरेल:-

गोव्यात सध्या पाण्याची समस्या उग्र रूप धारण करीत असून आणखीन एक- दोन वर्षात नेमकी काय स्थिती असेल याचा अंदाज नाही. खुद्द पर्यावरणतज्ज्ञ व संशोधक आदींना ठोस निर्णय घेणे शक्य नाही. त्यासाठी मोठ्या प्रकल्पांना पाणी पुनर्वापर प्रकल्प साकारण्याची सक्ती प्रभावी ठरेल, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

सरकारने भविष्याचा विचार करून ज्या ठिकाणी पाण्याचा वापर अधिकाधिक होत असतो, अशा प्रकल्पात पुनर्वापराचा प्रकल्प सक्तीचा करून योजनांची अंमलबजावणी करावी व नळाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

Water Dispute
Francis Sardine: मी का माफी मागू , काय चुकले?

गोव्याचा विकास हा उद्योगधंदे व अन्य प्रकल्पामुळे होऊ शकतो, असे प्राथमिक मत आहे. त्यासाठी बेळगाव येथील केएलई इस्पितळात जसा पाणी पुनर्वापर प्रक्रिया प्रकल्प उभारला आहे, त्याचा फायदा बहुआयामी पद्धतीने राज्यांच्या विकासाला होत असतो.

त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होत असतो, परिणामी ग्राहकांना पाणी पुरवठा नित्य व पुरेसा होतो. सरकारने एक खिडकी योजना राबवून पाणी पुनर्वापर योजनांची सक्त अंमलबजावणी करण्यासाठी पावले उचलावीत.

- इनासियो डिसोझा, माजी सरपंच

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com