Himachal Pradesh Governor  Rajendra Arlekar

Himachal Pradesh Governor  
Rajendra Arlekar

Dainik Gomantak 

'युवकांनी राष्ट्रवादी व्हावे': राज्यपाल राजेंद्र आर्लेकर

स्वातंत्र्यानंतरच्या 60 वर्षांत युवकांना झालेली जागृती हेच काय ती आमची मिळकत आहे असेही राज्यपाल आर्लेकर (Rajendra Arlekar) म्हणाले.
Published on

सासष्टी: स्वातंत्र्यानंतरच्या महत्वाच्या घटना हा पण कधी ना कधी इतिहास जमा होणार आहे. त्यामुळे या इतिहासासह आमचा पुर्वीचा इतिहास पुढील पिढीकडे हस्तांतरीत करण्याची जबाबदारी युवकांवर असल्याचे प्रतिपादन हिमाचल प्रदेशचे (Himachal Pradesh) राज्यपाल राजेंद्र आर्लेकर (Rajendra Arlekar) यानी प्रतिपादन केले. ते पुढे म्हणाले की युवक ही जबाबदारी उत्तमप्रकारे निभावू शकतात. सद्याचा युवक योग्य दिशेने विचार करीत असुन त्यांना केवळ मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे. युवकांनी राष्ट्रवादी होणे गरजेचे आहे. राष्ट्रभक्तीची भावना त्यांच्या मन व हृदयामध्ये निरंतर असणे महत्वाचे आहे. गोव्याच्या स्वातंत्र्यानंतरच्या 60 वर्षांत युवकांना झालेली जागृती हेच काय ती आमची मिळकत आहे असेही राज्यपाल आर्लेकर म्हणाले.

गोव्याच्या (Goa) माहिती व प्रसिद्धी खात्याने आझादीका अमृत महोत्सव व गोवा मुक्तीची 60 वर्षे निमित्ताने आयोजित केलेल्या गोवा उत्सव व्याख्यान मालिकेत बोलताना राज्यपाल आर्लेकर बोलत होते. हे व्याख्यान मडगावच्या रवीन्द्र भवन सभागृहात आयोजित करण्यात आले. या प्रसंगी रवीन्द्र भवनचे अध्यक्ष दामोदर नाईक, सदस्य सचिव संध्या कामत, माहिती व प्रसिद्धी खात्याचे माहिती अधिकारी प्रकाश नाईक उपस्थित होते. या व्याख्यानाला शालेय, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्य़ांनी गर्दी केली होती.

<div class="paragraphs"><p>Himachal Pradesh Governor&nbsp;&nbsp;<br>Rajendra Arlekar</p></div>
काँग्रेस निवडणुकीच रणशिंग फुंकणार? यादी आज जाहीर होण्याची शक्यता

आमच्या या पुर्वीच्या पिढीने गोव्याचा इतिहास योग्य रितीने आमच्यापुढे मांडला नाही अशी खंत त्यानी व्यक्त केली. युवकांना खरा इतिहास सांगण्यात लाज ती का वाटावी असा प्रश्र्नही त्या आमच्या या पुर्वीच्या पिढीने गोव्याचा इतिहास योग्य रितीने आमच्यापुढे मांडला नाही अशी खंत त्यानी व्यक्त केली. युवकांना खरा इतिहास सांगण्यात लाज ती का वाटावी असा प्रश्र्नही त्यानी उपस्थित केला. काही लोकांनी इतिहासाबद्दलचा भ्रम, गोंधळ तयार केला.. केवळ 1510 ंनंतरचा इतिहास आमच्यापुढे प्रस्तुत केला. याचा अर्थ त्यापुर्वी गोवा ्अस्तित्वात नव्हता का? गोव्याच्या इतिहास हा कोट्यावधी वर्षापुर्वींचा आहे असेही राज्यपाल आर्लेकर म्हणाले.

शालेय अभ्यासक्रमात जो इतिहास शिकवतात तो पुर्ण नाही. पोर्तुगीजानी आमच्यावर हल्ला केला, अत्त्याचार केले ही वस्तुस्थिती आहे. ती का नाकारावी? असा प्रश्र्नही त्यानी उपस्थित केला. ज्या भागामध्ये आपण राहतो त्याचा इतिहास, भुगोल जाणुन घेणे महत्वाचे असल्याचेही त्यानी सांगितले. मी भारतीय आहे. सर्व भारतीय माझे बांधव आहेत, याचा अर्थ समजणे व त्याचा साक्षात्कार होणे युवकांसाठी महत्वाचे व गरजेचे असल्याचे त्यानी शेवटी सांगितले. भारत व गोव्याची संस्कृती वेगळी नाही. अशा प्रकारची व्याख्याने गंभीरपणाने घ्या. ही माहिती भविष्यात फायद्याची ठरेल असे आवाहन दामू नाईक यानी केले. माहिती अधिकारी प्रकाश नाईक यानी सर्वांचे स्वागत केले तर सिद्धेश सामंत यानी सुत्रसंचालन व शेवटी आभार व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com