बस्तोडातील तरुणाने मांडवी नदीत उडी घेत संपवले जीवन; अधिक तपास सुरू

पर्वरी व पणजी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे
Crime news
Crime newsDainik Gomantak
Published on
Updated on

Youth From Bastora Ended his life by jumping from Mandovi Bridge

उसकई-बस्तोडा (म्हापसा) येथील 27 वर्षीय फारुख या तरुणाने काल (28 नोव्हेंबर) मध्यरात्री मांडवी पुलावरून उडी घेऊन जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर पर्वरी व पणजी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.

Crime news
Goa News Update 29 November: वाचा दिवसभरातील ठळक घडामोडी एका क्लिकवर

पोलीस फारुखच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत. बेरोजगारीमुळे वैफल्यग्रस्तातून त्याने आत्महत्या केल्याचा संशय त्याच्या कुटुबियांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, मागील काही दिवसात नदी-समुद्रात उडी मारून जीवन संपवण्याच्या काही घटना समोर आल्या आहेत.

बायणा समुद्रकिनाऱ्यावर सोमवारी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मडगाव पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक स्टेनली गोम्स या घटनेचा पुढील तपास करत आहेत. माहितीनुसार काही अंतरावर त्या व्यक्तीचे कपडे आणि काही वस्तू होत्या. त्यामुळे सदर मृत व्यक्तीने समुद्रात उडी मारून आत्महत्या केली असल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com