Bihar To Goa
Bihar To Goa Dainik Gomantak

वडिलांच्या भीतीने बिहारचा 10 वर्षीय मुलगा आला गोव्यात, बेपत्ता झाल्याची तक्रार दिली, अखेर 10 दिवसांनी...

तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिस यंत्रणा अलर्ट झाल्या व मुलाचा शोध सुरू झाला.
Published on

Bihar To Goa: बिहारच्या बोधगया परिसरातून दहा वर्षीय मुलगा अचानक बेपत्ता झाला. मुलाचा सर्वत्र शोध घेतला पण तो कुठेही सापडला नाही. अखेर नाईजास्तव पालकांनी पोलिसांत धाव घेत मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिस यंत्रणा अलर्ट झाल्या व मुलाचा शोध सुरू झाला. (Bihar Youth Escape to Goa)

जोनपूर, बोधगया येथील सोम कुमार हा दहा वर्षीय मुलगा 10 मार्च रोजी अचानक बेपत्ता झाला. पालकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, पण तो सापडला नाही. त्याचे वडिल अयोध्या सिंह यांनी याप्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी शोधकार्य सुरू केले.

मुलगा अखेर दहा दिवसांनी परत बोधगया येथे सापडला. बेपत्ता झाल्यानंतर तो गोव्यात आला होता. दहा दिवसानंतर तो परत आपल्या गावी परतला.

Bihar To Goa
Chhattisgarh Teachers In Goa: वैद्यकीय रजा अन् गोव्यात मजा! सरकारी शिक्षकांचे भलतेच काम आले समोर, दिले चौकशीचे आदेश

वडिलांच्या भीतीने आला होता गोव्यात

दहा वर्षीय सोम कुमार वडिलांच्या भीतीने गोव्यात आला होता अशी माहिती समोर आली आहे. घाबरलेल्या सोम कुमारने मित्रांकडून पैसे गोळा केले. त्यानंतरतो मुंबईत गेला, तिथून त्याने पुन्हा गोवा गाठले. दहा दिवसांनंतर तो बोधगया येथे पोहोचला.

पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले, चौकशी करून मुलाला सुखरूप त्याच्या पालकांच्या हवाले करण्यात आले. दरम्यान, मुलाला वडिलांची कोणत्या कारणासाठी भीती वाटत होती याचे कारण समोर आलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com