Death
DeathDainik Gomantak

Quepem: वर्षाच्या अखेरच्या दिवशी कासव पकडण्यासाठी गेलेल्या दोघांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

नुने-सांगे येथील दोन युवकांचा नदीत बुडून दुर्दैवी अंत झाला.
Published on

Quepem: वर्षाच्या अखेरच्या दिवशी नुने-सांगे येथील दोन युवकांचा दुर्दैवी अंत झाला. काल सकाळी नुने-सांगे येथील नदीत कासव पकडण्यासाठी गेलेले सतीश पावटो गावकर (35) आणि रामदास पुरसो गावकर (40) यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

नुने-सांगे येथील सतीश गावकर, रामदास गावकर आणि आणखी एक युवक असे तिघे मिळून नदीवर कासव पकडण्यासाठी गेले होते. संध्याकाळपर्यंत ते परत न आल्याने लोकांनी त्यांची शोधाशोध करण्यास सुरुवात केली.

Death
Goa: सेलिब्रिटींचे गोव्यात ‘न्यू इयर सेलिब्रेशन’

या नदीतील दगडाच्या गुहेत कोणीतरी अडकून पडल्याचे दिसताच लोकांनी त्यापैकी एकाला ओढून बाहेर काढले; परंतु सतीश आणि रामदास यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह गुहेत बरेच आतमध्ये अडकून पडले. रात्री 9 वाजता अग्निशामक दलाने लोकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह बाहेर काढले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com