Goa: सेलिब्रिटींचे गोव्यात ‘न्यू इयर सेलिब्रेशन’

सारा-अर्जुन तेंडुलकर यांच्यासह सिने तारे-तारकांची धमाल : गायक-नृत्यांगनांची धूम
Ameesha patel ,New Year Celebration
Ameesha patel ,New Year CelebrationDainik Gomantak
Published on
Updated on

Goa: सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक सेलिब्रिटी गोव्यात दाखल झाले आहेत, तर काही सेलिब्रिटी हे विशेष कार्यक्रमांनिमित्त आधीच डेरेदाखल झाले आहेत. याशिवाय राजकीय मंडळीही गोव्यात दाखल झाली आहे.

मात्र, त्यांचे हे खासगी दौरे असल्याने त्याविषयी गुप्तता बाळगण्यात आली असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. केंद्रीय मंत्री पीयुष गोएल हे सहकुटुंब गोव्यात नववर्ष स्वागतासाठी यापूर्वीच दाखल झाले आहे. प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार तर चार दिवस अगोदर आपल्या पत्नी ट्विंकलसह गोव्यात त्याच्या घरी आला आहे.

सिने तारका अमिषा पटेलसह येथील तारांकित हॉटेल, कॅसिनो यांनी नववर्षानिमित्त आयोजित केलेल्या पार्ट्यांसाठी प्रसिद्ध सिने तारे-तारकांची मांदियाळी निमंत्रित करण्यात आली आहे.गेल्या तीन दिवसांपासून विविध कलाकारांनी या पार्ट्यांना हजेरी लावली आहे.

शनिवारी रात्री गायक हिमेश रेशमिया, आकसा, बॉम्बे विकिंग्स, विकल्प मेहता यांच्यासह सपना चौधरी यासारख्या नृत्यांगणांचे कार्यक्रम काही कॅसिनोंमध्ये झाले. उपस्थित पर्यटकांना त्यांनी संगीताच्या तालावर डोलायला भाग पाडले.

Ameesha patel ,New Year Celebration
Goa: गोव्यात गर्दीने फुलले किनारे; जल्लोषात नव्या वर्षाचे स्वागत

दोन दिवसांपूर्वी विनोदी अभिनेते सतीश कौशिक हेही नूतन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात आले आहेत. दुसऱ्या बाजूला मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन हा गोवा रणजी संघाकडून खेळत असल्याने त्याचा मुक्काम गोव्यातच आहे. त्याच्यासोबत आता नववर्षाच्या स्वागतासाठी अर्जुनची बहीण सारा तेंडुलकरही गोव्यात दाखल झाली आहे. या दोघांनीही येथील पारंपरिक रुचकर खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत सेल्फी काढून नववर्षाचा आनंद साजरा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com