Anjuna Drowning Incident: पाय घसरला अन् थेट उधाणलेल्या समुद्रात कोसळला! 26 वर्षीय मणिपूरच्या तरुणाचा मृत्यू;  हणजूण समुद्रकिनाऱ्यावरील धक्कादायक घटना

Tourist Drowns In Goa: हणजूण येथे खडकावरून पाय घसरून समुद्रात कोसळल्याने यापन शेरॉन (वय २६ वर्षे, रा. पर्वरी, मूळ मणिपूर) हा तरुण बुडाला.
Tourist Drowns In Goa
Anjuna Drowning IncidentDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: हणजूण येथे खडकावरून पाय घसरून समुद्रात कोसळल्याने यापन शेरॉन (वय २६ वर्षे, रा. पर्वरी, मूळ मणिपूर) हा तरुण बुडाला. ही दुर्घटना मंगळवारी (२८ जुलै) सायंकाळी ५.४० च्या सुमारास घडली. हा तरुण पणजीतील एका हॉटेलमध्ये कार्यरत होता. यापन हा तीन हॉटेल सहकाऱ्यांसोबत हणजूण किनारी फिरण्यासाठी आला होता. जोरदार लाटा खडकांवर धडकत असतानाही चौघांपैकी दोघेजण समुद्रात उतरले होते.

यावेळी जीवरक्षकांनी त्यांना समुद्राबाहेर काढले. मात्र, काही वेळाने जीवरक्षकांची नजर चुकवून यापन पुन्हा किनाऱ्यावरील खडकांवर गेला. तेथे अचानक पाय घसरल्याने तो थेट उधाण आलेल्या समुद्रात कोसळला आणि लाटांच्या जोरदार प्रवाहासोबत वाहून गेला. त्याच्या मित्रांनी आरडाओरड केली; परंतु वादळी वारे आणि समुद्राच्या रौद्र रूपामुळे जीवरक्षकांना त्याला वाचविणे अशक्य झाले आणि तो पाण्यात बुडाला.

Tourist Drowns In Goa
Goa Drowning Incident: उधाणलेल्या लाटा अन् जीवरक्षकांचे शौर्य! सलग तीन दिवसांत 3 होड्या उलटल्या; कोलवा आणि बाणावलीत 28 मच्छीमारांची सुखरुप सुटका

या घटनेची माहिती मिळताच हणजूण पोलिस आणि म्हापसा अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, समुद्रातील धोकादायक परिस्थितीमुळे बचावकार्य हाती घेण्यात अडचणी येत होत्या. याप्रकरणी हणजूण पोलिस तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com