साहित्य वर्तुळासाठी आनंदाची बातमी; मावजोंचे 'The Wait and Stories' अंतीम यादीत

गोव्यातील साहित्य वर्तुळासाठी ही आनंदाची बातमी
The Wait and Stories
The Wait and StoriesDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: ज्येष्ठ कोकणी साहित्यिक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावजो यांच्या 'द व्हेट अँड स्टोरीज' या पुस्तकाला प्रतिष्ठेच्या बंगळूर साहित्य महोत्सव पुरस्काराच्या अंतिम यादीत स्थान मिळाले आहे. हा महोत्सव तीन व चार डिसेंबर रोजी येथे होणार आहे.

(writer Damodar Mauzo's book 'The Vet and Stories' has been shortlisted for the prestigious Bangalore Sahitya Mahotsav Award)

The Wait and Stories
Goa Enironment: काणकोणात मासळी विक्रेत्यांकडून प्लास्टिक पिशव्‍यांचा वापर

मावजो यांच्या 'तिष्ठावणी' या मूळ कोकणी पुस्तकाचा हा अनुवाद असून झेवियर कोता यानी हे पुस्तक इंग्रजीत भाषांतरित केले आहे. हे पुस्तक पेंग्विन या प्रतिष्ठित प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले आहे.

बंगळूर साहित्य महोत्सव पुरस्कार हा प्रतिष्ठेचा साहित्य पुरस्कार समजला जात असून अंतिम यादीतील तीन ते चार पुस्तकांपैकी एका पुस्तकाला शेवटच्या क्षणी तो जाहीर केला जातो. साहित्य वर्तुळात या पुरस्काराला बरेच वरचे स्थान आहे.

The Wait and Stories
Marathi Science Council Goa: 19 तारखेपासून गोव्यात मराठी विज्ञान परिषदेचे 57 वे अधिवेशन

ऑक्टोबर महिन्यात या पुरस्कारासाठी 12 पुस्तकांची प्राथमिक यादी तयार करण्यात आली होती. मागच्या आठवड्यात या पुरस्कारासाठी अंतिम चार पुस्तकांची यादी तयार करण्यात आली असून त्यात मावजो यांच्या या पुस्तकाचा समावेश आहे. गोव्यातील साहित्य वर्तुळासाठी ही आनंदाची बातमी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com