Goa CM contest :CM सावंतांची 'सुवर्णगाथा' लिहा, 12 हजारांपेक्षा जास्त जिंका; साखळी नगरपालिकेची अनोखी स्पर्धा

Sanquelim Municipality Event: स्पर्धेत विजेतेपद पटकावणाऱ्या पहिल्या स्पर्धकाला तब्बल १२,२२२ चे रोख बक्षीस आणि आकर्षक भेटवस्तू दिली जाईल
creative writing contest Goa
creative writing contest GoaDainik Gomantak
Published on
Updated on

CM Biography Contest: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रीपदाची यशस्वीपणे सहा वर्षे पूर्ण केल्याबद्दल साखळी नगरपालिकेतर्फे एका खास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत विजेतेपद पटकावणाऱ्या पहिल्या स्पर्धकाला तब्बल १२,२२२ चे रोख बक्षीस आणि आकर्षक भेटवस्तू दिली जाईल. याबाबतची माहिती साखळीच्या नगराध्यक्षा सिद्धी प्रभू यांनी दिली.

'सुवर्णगाथा' - मुख्यमंत्र्यांच्या अनुभवांचे प्रेरणादायी संकलन

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्री म्हणून यशस्वीपणे सहा वर्षे पूर्ण केल्याबद्दल, साखळी नगरपालिकेतर्फे त्यांच्याबद्दलच्या प्रेरणादायी कथा तसेच मुख्यमंत्र्यांच्या सहवासात किंवा भेटीदरम्यान स्वतःला आलेले अनुभव कहाणी स्वरूपात लिहिण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

creative writing contest Goa
Pramod Sawant: रोजगार संधीचा लाभ गोमंतकीय घेत नसल्याची CM सावंतांनी व्यक्त केली खंत

'सुवर्णगाथा' असे नाव दिलेल्या या कथा लेखन स्पर्धेचे आयोजन १५ ऑगस्ट रोजी केले जाईल. या कथा येणाऱ्या काळात नवीन पिढीला प्रोत्साहन देतील, अशी आशा नगराध्यक्षा सिद्धी प्रभू यांनी व्यक्त केली आहे.

आकर्षक बक्षिसे आणि मुख्यमंत्र्यांसोबत जेवणाची संधी

या स्पर्धेतील पहिल्या पाच विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसे दिली जाणार आहेत:

  • प्रथम क्रमांक: १२,२२२

  • द्वितीय क्रमांक: ९,९९९

  • तृतीय क्रमांक: ८,८८८

  • चतुर्थ क्रमांक: ६,६६६

  • पाचवा क्रमांक: ५,५५५

यासोबतच, या विजेत्यांना त्यांच्या कुटुंबासह मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबासोबत दुपारी किंवा रात्रीच्या जेवणाची खास संधी मिळणार आहे. स्पर्धकांनी ५०० शब्दांची गोष्ट ३१ जुलैपर्यंत साखळी नगरपालिकेकडे सादर करायची आहे. या कथांचे परीक्षण करताना ती कथा किती प्रेरणादायी आहे, या निकषावर भर दिला जाईल.

नगराध्यक्षा सिद्धी प्रभू यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, या स्पर्धेतील पहिल्या पाच पुरस्कारप्राप्त कथांसह एकूण १६ कथांचे एक पुस्तक तयार केले जाणार आहे, ज्यामुळे या सर्व कथा संग्राह्य स्वरूपात उपलब्ध होतील आणि त्या भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणास्रोत ठरतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com