Worms In Water: नळाच्या पाण्यात सापडल्या आळ्या, आजोशी-मंडूर येथील अनेकांची तब्येत बिघडली

Worms In Water: पाण्याची गुणवत्ता तपासणीसाठी नमुने घेण्यात आल्याची माहिती बांधकाम विभागाने दिली आहे.
Worms In Water
Worms In WaterDainik Gomantak
Published on
Updated on

Worms In Water

आजोशी-मंडूर पंचायतमधील धाकटेभाट आणि डोंगरी येथील काही स्थानिकांच्या घरी नळाच्या पाण्यात आळ्या आढळून आल्या आहेत. दूषित पाणी पिल्याने या भागातील अनेकांच्या तब्येत बिघडली असल्याची माहिती समोर आली आहे. नळातून येणाऱ्या पाण्यातच या आळ्या सापडल्याने खळबळ निर्माण झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने नळाच्या पाण्यात आळ्या आढळून आल्या. रविवारी काही घरांमध्ये दूषित पाणी आल्याची तक्रार स्थानिकांनी केली. नळाच्या पाण्यात टॉर्चने प्रकाश टाकल्यावर पाण्यात आळ्या आढळून आल्याचे स्थानिकांनी म्हटले.

दूषित पाणी पिल्याने अनेकांना उलटी, चक्कर येणे तसेच अस्वस्थपणा जाणवला. पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटल्यानेच दूषित पाणी पुरवठा होत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.

Worms In Water
Goa Petrol-Diesel Price: गोव्यात पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल, जाणून घ्या ताजे भाव

दरम्यान, बांधकाम विभागाच्या कर्माचाऱ्यांनी फुटलेली पाईप दुरुस्त करुन पाणी पुरवठा सुरळीत केला, मात्र पाण्यातून अद्याप गाळ आणि माती येत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली.

पाण्याची गुणवत्ता तपासणीसाठी नमुने घेण्यात आल्याची माहिती बांधकाम विभागाने दिली आहे.

दरम्यान, याच भागातील काही नागरिकांनी त्यांना मात्र स्वच्छ पाणी पुरवठा झाल्याचे म्हटले आहे. आरोग्य विभाग बांधकाम विभागाच्या मदतीने संयुक्त तपासणी करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Rainfall Deficit 2026
 Shappora River water Goa
Mhadei Water Dispute
Goa Mhadei Water Dispute
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com