Taleigao Super Market: किळसवाणा प्रकार! चॉकलेटमध्ये सापडला किडा, ताळगावातील धक्कादायक घटना

Taleigao News: ताळगावमधून चॉकलेटमध्ये किडा आढळल्याची घटना समोर आली आहे. ताळगावातील एका सुपरमार्केटमध्ये एक कुटुंब खरेदीसाठी गेले होते.
किळसवाणा प्रकार! चॉकलेटमध्ये सापडला किडा, ताळगावातील धक्कादायक घटना
Chocolate Dainik Gomantak
Published on
Updated on

ताळगाव: ताळगावमधून चॉकलेटमध्ये किडा आढळल्याची घटना समोर आली आहे. ताळगावातील एका सुपरमार्केटमध्ये एक कुटुंब खरेदीसाठी गेले होते. यादरम्यान, खरेदी केलेल्या चॉकलेटमध्ये किडा आढळल्याने एकच खळबळ उडाली. कुटुंबाने तात्काळ सपुरमार्केटच्या मालकाकडे यासंबंधी तक्रार केली.

प्रकरण नेमकं काय?

रविवारी (8 नोव्हेंबर) सकाळी तळगाव येथील एका सुपरमार्केट मध्ये एक कुटुंब खरेदीसाठी गेले होते. त्यावेळी घरातील दैनंदिन उपयोगी सामानासोबत आपल्या 8 वर्षीय मुलासाठी त्यांनी चॉकलेट्स घेतले. ते चॉकलेट्स (Chocolates) खाण्यासाठी उघडल्यावर त्यात त्या 8 वर्षीय मुलाला किडा सापडला. त्याने तो आपल्या पालकांना दाखवल्यावर सदर कुटुंबाने सुपरमार्केटच्या मालकाकडे तक्रार करण्यासाठी गेले. मालकाने कुटुंबांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

किळसवाणा प्रकार! चॉकलेटमध्ये सापडला किडा, ताळगावातील धक्कादायक घटना
Goa Crime: काँग्रेस नेते चोडणकर यांच्‍या कारची नासधूस; 'ट्विट'वरुन हल्ला झाला असल्याची शक्यता, बजरंग दलाने फेटाळले आरोप

त्याबद्दल त्यांना पैसे परत देण्याचेही वचन दिले. परंतु ते कुटुंब काही केल्या ऐकेना. शेवटी त्या कुटुंबाने एफडीएकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, गोव्यात (Goa) मागील काही दिवसांपासून अशा प्रकारच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. दोनच दिवसांपूर्वी साखळीतूनही अशीच घटना समोर आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com