World Senior Citizens Day 2023: ज्‍येष्‍ठांनो, भिवपाची गरज ना; तुमच्‍यासाठी 1097 हेल्‍पलाईन!

म्हापशात कार्यक्रम : मुख्यमंत्र्यांसह पोलिसांनी जागवला विश्वास
Goa CM Pramod Sawant Inaugurated Helpline Number For Senior Citizen
Goa CM Pramod Sawant Inaugurated Helpline Number For Senior CitizenDainik Gomantak
Published on
Updated on

Goa CM Pramod Sawant Inaugurated Helpline Number For Senior Citizen: अलीकडच्या काळात सायबर गुन्हे वाढलेत. यातील गुन्हेगार अनेकदा ज्येष्ठ नागरिकांना टार्गेट करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. ज्येष्ठांच्या हतबलतेचा गैरफायदा घेतला जात असल्याचे वाढत्या गुन्हेगारीतून समोर आले आहे.

सरकार व गोवा पोलिस हे आपले संरक्षण व तब्येतीची काळजी घेण्यासाठी सदैव तत्पर आहेत. तुम्हाला कुठलीही समस्या भेडसावल्यास 1097 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Goa CM Pramod Sawant Inaugurated Helpline Number For Senior Citizen
Margao Doctor Crime News : मडगावातील 'त्या' डॉक्टराविरोधात विनयभंगाची दुसरी तक्रार

सोमवारी म्हापशात आयोजित विशेष कार्यक्रमात उत्तरेतील ज्येष्ठांसाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम तसेच सायबर कायद्यांतर्गत ज्येष्ठांच्या हक्कांबाबत माहिती देण्यात आली. यावेळी आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोवा पोलिस महासंचालक जसपाल सिंग, महानिरीक्षक ओमवीर सिंग बिश्नोई, पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन, उपअधीक्षक जीवबा दळवी आदी उपस्थित होते.

Goa CM Pramod Sawant Inaugurated Helpline Number For Senior Citizen
Goa University Director Threatened: ‘अभाविप’च्या कार्यकर्त्याची गोवा विद्यापीठात दबंगगिरी; विद्यार्थी कल्याण संचालकांना धमकी

"अनेकदा घरातील मुले शिक्षण किंवा रोजगारानिमित्त इतरत्र स्थलांतर होतात. त्यामुळे वडिलधाऱ्यांची काळजी घेणारे घरी कुणीच नसते. अशावेळी गोवा पोलिस ज्येष्ठांची काळजी घेते. त्यांना लागणारी औषधे तसेच इतर साम्रगी पोलिस घरपोच आणून पुरवितात."

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

यांचा झाला सन्मान

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त मनोहर अय्यर, मारिया इमेल्डा डिसोझा, घनश्याम नाईक, जोनिता वरावजो, सुहासिनी चोडणकर, एनजेला डोरेटी ब्रागांझा, डॉ. सचिन गोवेकर, फिन्टन डिसोझा, मोहम्मद मनीहर, जमशेद खान यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com