World Mental Health Day: मानसिक आरोग्याची काळजी घेणे ही काळाची गरज

World Mental Health Day: मानसिक आरोग्य हे मेंदू, शरीर आणि मन या तिन्हीशी निगडीत असल्यामुळे त्‍यात संतुलन असणं खूप गरजेचं असतं.
World Mental Health Day
World Mental Health DayDainik Gomantak

World Mental Health Day: मानसिक आजारामुळे माणसाच्या भावना, विचार, परस्पर संबंध व दैनंदिन जीवनातील गोष्टींवर विपरित परिणाम होतो. विसरभोळेपणा, निद्रानाश, द्विधा मन:स्‍थिती, वाईट स्वप्ने पडणे, भूक मंदावणे, दुबळेपणा, चक्कर, घाम येत राहणे आदी लक्षणे रुग्‍णामध्‍ये आढळतात.

दरम्यान, याचाच आणखी एक प्रकार म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल अवास्तव नावड किंवा भीती (फोबिया) असणे. ती गोष्ट पुढे आली की त्या व्यक्तीचा स्वतःवर ताबा राहत नाही. थोडक्यात व्याख्या करायची झाल्यास ‘संतुलित जीवनशैली’ असणं म्हणजे मानसिक आरोग्य असं म्हणता येईल.

World Mental Health Day
Goa Government: गोव्यात फिजिओथेरपीसाठी मंडळ स्‍थापणार!

मानसिक आरोग्य हे मेंदू, शरीर आणि मन या तिन्हीशी निगडीत असल्यामुळे त्‍यात संतुलन असणं खूप गरजेचं असतं. हे संतुलन जोपर्यंत आहे तोपर्यंत आपलं मानसिक आरोग्य चांगलं आहे असं समजलं जातं.

सध्याच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात अनेक कारणांमुळे आपलं मानसिक आरोग्य ढासळत चाललं आहे आणि आपण आपल्या जीवनातल्या आनंदी क्षणापासून वंचित राहत आहोत. परिणामी आपण अधिकच तणावग्रस्त बनत चाललो आहोत.

World Mental Health Day
Goa News: कार्डिनल फिलीप नेरी फेर्रांव यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार

जागतिक मानसिक आरोग्यदिन विशेष: डॉ. रुपेश पाटकर, मनोविकारतज्‍ज्ञ-

मानसिक आजार औषधोपचारांनी नियंत्रणात आणता येताे. समाजात 1 टक्का लोकांना तीव्र स्वरूपाचे तर 10 टक्के लोकांना सौम्य स्वरूपाचे आजार असतात. मानसिक आजारात रुग्‍णाच्‍या वागणुकीत बदल होत असल्याने लोकांना ते अद्भूत शक्तीचे प्रताप वाटतात. त्याचा फायदा जादूटोणा करणारे लोक उठवतात. त्यामुळे जागृती होणे गरजेचे आहे.

प्रमुख कारणे

  • बदलती जीवन शैली हे मानसिक आरोग्य बिघडण्याचे मुख्य कारण. कोणतीही गोष्ट प्राप्त करण्यासाठी जो संयम लागतो तो आजच्या पिढीमध्ये दिसून येत नाही. महत्त्वाकांक्षा असणं वेगळं आणि अतिमहत्त्वाकांक्षा असणं हे वेगळं. या अतिमहत्त्वाकांक्षेपायी आजचा युवक तणावाखाली येत आहे.

World Mental Health Day
Goa Government: राज्यपाल पिल्लई हुकूमशाहीपुढे झुकले- गिरीश चोडणकर
  • दुसरी गोष्‍ट म्‍हणजे विभक्त कुटुंबपद्धतीमुळे लहान मुलं चिडचिड करतात. घरात त्यांच्याशी बोलायला कुणीच नसल्याने मुलं खेळण्याशी, बाहुल्यांशी बोलतात. अशा वेळी पालकांनी त्‍यांच्‍याकडे लक्ष द्यायला हवे.

गैरसमज अधिक: मानसिक रुग्ण म्हटले की कोणीच त्‍या व्‍यक्तीला जवळ करत नाही. गैरसमज आहे की हा आजार नसून कोणीतरी बुवाबाजी किंवा जादूटोणा केला आहे. त्‍यामुळे रुग्‍णाला डॉक्‍टराकडे न नेता बुवांकडे नेतात. त्‍यामुळे उपयोग तर काहीच होत नाही, उलट हजारो रुपये वाया जातात. मानसिक आजात डिप्रेशन हा सगळ्यात घातक आजार आहे. त्‍यावर वेळीच उपचार व्‍हावेत.

World Mental Health Day
Goa Politics: 'तो' अध्यादेश कायदेशीरच; कायद्यात गुप्त मतदानाची तरतूद नाही!

उपाय कोणते?: समुपदेशन, मानसिक उपचार, संमोहन, इलेक्ट्रोकोनवल्सिव थेरेपी खूप उपयोगी ठरते. सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे, ध्यान-धारणा, योगासने, नाम:स्मरण, जीवनातील विविध घटना व तणाव हातळण्याचे शिक्षण मुलांना देणे, पौष्‍टिक आहार, शारीरिक गतिविधी व जीवन संतुलित करणारे छंद जोपासणे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com