E-Waste Collection: लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रीक्ट 317 बी यांनी केंद्र तसेच राज्य सरकाराच्या सहकार्याने 13 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2023 या कालावधीत जगातील सर्वांत मोठ्या ई-कचरा संकलन मोहिमेचे आयोजन केले आहे.
या मोहिमेचा शुभारंभ गोव्यातून 14 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. शुभारंभ सोहळा मडगाव येथील श्री दामोदर महाविद्यालयाकडून सकाळी 10.30 वाजता होणार असून या कार्यक्रमाला पर्यावरण मंत्री निलेश काब्राल उपस्थित राहणार आहेत.
या 317 डिस्ट्रिक्टमध्ये गोवा व कर्नाटक राज्यातील मिळून 106 लायन्स क्लबांचा समावेश आहे. या सर्व क्लबांचे सदस्य या मोहिमेत सहभागी होणार आहेत.
ही माहिती काल मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पहिले व्हाईस डिस्ट्रीक्ट गवर्नर लायन अर्ल ब्रिटो यांनी दिली. पत्रकार परिषदेला आश्र्विन कर्पे, राहुल वेरेकर, जयअमोल नाईक, रईस अहमद हे गोव्यातील इतर लायन्स क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.
ई-कचऱ्या संकलनासाठी 61 वस्तुंची निवड केली असून त्यात जुने किंवा निकामी संगणक, लॅपटॉप, मोबाईल, वॉशिंग मशीन, बल्ब, ट्युबलाईटस, केबल्स, टॉस्टर्स, मिक्सर, इत्यादींचा समावेश आहे. ही मोहीम पॅन इंडिया कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे.
चार ठिकाण कचरा संकलन
गोव्यामध्ये चार ठिकाणी हा ई-कचरा गोळा केला जाईल, त्यात ओ ब्रिंदाव, नॅश मोटर्सच्या समोर, नावेली (सालसेत), आलस्का बॉटलिंग, चिखली, वास्को, गोवा सिनियर सिटीझन घर, नायकवाडो कळंगुट व फोंडा यांचा समावेश आहे.
हा एक महिना ई-कचऱ्याबद्दल लोकांमध्ये जागृती करण्यासाठी असेल. ही मोहीम वर्षभर चालू असेल असे या वेळी सांगण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.