Valpoi Cyclothon Rally : जागतिक सायकल दिनानिमित्त वाळपईत सायक्लोथाॅन

सायकल चालवा, पर्यावरण वाचवा : डाॅ. नाईक
Cyclothon Rally
Cyclothon RallyGomantak Digital Team

Valpoi Cyclothon Rally : सायकल चालवणे, चालणे, खेळणे, व्यायाम करणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते. त्यातल्या त्यात सायकल चालवणे हे आपल्या शरीराच्या दृष्टीने जास्तीत जास्त आरोग्यदायी आहे. त्याचबरोबर प्रदूषणकारी वाहने टाळून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सायकल चालविली पाहिजे, असे प्रतिपादन वाळपई सामाजिक आरोग्य केंद्रातील डाॅ. विकास नाईक यांनी केले.

आरोग्य सेवा संचालनालय, आयुष्मान भारत, सामुदायिक आरोग्य केंद्र वाळपई आणि डाॅ. के. ब. हेडगेवार शाळा यांच्या वतीने मंगळवारी जागतिक सायकल दिनानिमित्त सायक्लोथॉन रॅलीचे आयोजन केले होते.

यावेळी व्यासपीठावर आरोग्याधिकारी डाॅ. श्याम काणकोणकर, डाॅ. विदेश जल्मी, डॉ. वैभव गाडगीळ, अकीब शेख, अपूर्वा आसोलकर, सुमेधा राणे, चंद्रू केरकर, नयना फोंडेकर, रामा गवस, प्रसाद सावंत, संतोष गावस, कदंब वाहतूक खात्याचे अधिकारी शशिकांत देसाई, हेडगेवार शाळेच्या शिक्षिका तसेच मान्यवर उपस्थित होते.

Cyclothon Rally
Valpoi News : वाळपईतील सरकारी शाळेच्या इमारतीला मिळाली नवी झळाळी

डाॅ. नाईक म्हणाले की, सायकल चालवल्याने पर्यावरणाचे रक्षण होऊन रहदारी कमी झाल्यामुळे अपघातांचे प्रमाणही कमी होऊ शकते. सध्याच्या ग्लोबल वॉर्मिंगच्या काळामध्ये वाढलेले हवा व ध्वनी प्रदूषण पाहता सायकलचा वापर करणे अतिशय गरजेचे आहे. यावेळी डाॅ. श्याम काणकोणकर, डाॅ. वैभव गाडगीळ यांनीही मनोगत व्यक्त केले. डाॅ. जल्मी यांनी आभार मानले.

Cyclothon Rally
Valpoi News : अंजुणे धरणात 68.01 मीटर पाणी

पोलिसांचे सहकार्य

सायकल रॅली वाळपई बसस्थानकाकडून दाबोस मार्गे परत बसस्थानकाकडे आणली. यावेळी डाॅ. हेडगेवार शाळेच्या मुलांसोबत वाळपई आरोग्य खात्याचे कर्मचारी व इतर 50 जणांनी या उपक्रमात सहभाग घेतला. सहभागी झालेल्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देण्यात आले. यावेळी वाळपई पोलिस व इतरांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. डाॅ. विकास नाईक यांनी रॅलीला झेंडा दाखवला.

सायकल चालवण्याचे असे आहेत फायदे

  • किमान अर्धा तास सायकल चालवल्यामुळे शरीर तंदुरुस्त राहते.

  • रक्ताभिसरण सुधारते आणि रक्तदाब संतुलित राहतो.

  • रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पचनक्रिया सुधारते.

  • शरीरातील अतिरिक्त कॅलरीज जळतात. त्यामुळे लठ्ठपणा कमी होतो.

  • हृदयविकार, मानसिक आजार, मधुमेह, संधिवात, उच्च रक्तदाब यांपासून बचाव.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com