Valpoi News : अंजुणे धरणात 68.01 मीटर पाणी

परिसर बनला कोरडा ः आता मॉन्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा, शेती-बागायतीची भागवते तहान
अंजुणे धरण
अंजुणे धरणgoa digital team
Published on
Updated on

सत्तरी तालुक्यातील अंजुणे धरणात सद्यस्थितीत ६८.०१ मीटर एवढी पाण्याची पातळी असून धरणातील बाजूकडील परिसराचे पात्र कोरडे बनले आहे.धरणातील बराचशी जागा, पात्रात पाणी नसले, तरी धरणाच्या मधील भागात सध्याच्या घडीला पुरेसे पाणी आहे. अंजुणे धरणाचे पाणी लोकांना पिण्यासाठी तसेच हिवाळ्यात, उन्हाळ्यात शेती, बागायतींना सिंचनासाठी पुरविले जाते.

त्यामुळे माणसाची तहान भागविण्याबरोबरच शेती, बागायतीला हे धरण वरदान ठरले आहे. अंजुणे धरणाचे पाणी सत्तरी तालुक्यात केरी, मोर्ले, सालेली, शिरोली, घोटेली, केरी केळावडे या गावांबरोबरच डिचोली तालुक्यातही पुरविले जाते. कुडचिरे, कुळण अशा अनेक डिचोली भागातील गावात धरणाचे पाणी पुरविले जाते.

अंजुणे धरण
Goa Accident News : डिचोलीतील अपघातांत आजोबा ठार; नातीसह दोघे जखमी

उन्हाळ्यात बागायती, शेतीच्या सिंचनासाठी शिरोली, घोटेली, केळावडे, रावण, केरी, मोर्ले, मोर्ले कॉलनी, पर्ये या भागातून पाणीपुरवठा करीत ते साखळी भागात कुडचिरे, कुळणपर्यंत कॅनलच्या माध्यमातून सिंचनासाठी वापरले जाते.पडोशे जल प्रकल्पावर पाणी सोडून तिथून अस्नोडा आदी भागात सोडले जाते. तसेच जलवाहिनीव्दारे लोकांना पिण्यासाठी पाणी पुरविले जाते.

अंजुणे धरण
State Symbols of Goa: गोव्याचे राज्य प्राणी, फळ, फुल माहिती आहेत? जाणून घ्या राज्याच्या प्रतिकांविषयी...

धरणाला झाली ३६ वर्षे

दोन कॅनलच्या माध्यमातून धरणाच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. तसेच केरी पोडोशे येथे जलशुध्दीकरण प्रकल्पावर पाणी पुरवून तिथे पाणी शुध्दीकरण करून लोकांना पुरविले जाते. अंजुणे धरण राज्यातील मोठे धरण म्हणून परिचीत आहे. या धरण बांधून ३६ वर्षे झाली आहेत. धरण बांधतेवेळी तेथील लोकांचे सत्तरीत अन्य ठिकाणी स्थलांतर केले होते.

अंजुणे धरण
Goa Vehicle Scrapping Policy : ...तर सरकारला योग्य जागा दाखविणार ; वाहनमालकांचा इशारा

सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले व आकर्षक अशा डोंगर टेकड्यांनी वेढलेले अंजुणे धरण हे मुख्य पाण्याचे साधन आहे.अंजुणे धरणात ६८.०१ मीटर एवढी पाण्याची पातळी स्थित आहे. एकूण धरणाची ९३ मीटर उंची आहे. सध्याच्या घडीला पाणी पुरेसे आहे. अजून काही दिवस ज्या परिसरात या धरणाच्या पाण्याचा पुरवठा केला जातो, तेथे पाणीटंचाई भासणार नाही.

- राम गावस (अधिकारी, अंजुणे धरण)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com