
Study Reveals 38 Percent of Doctors in Goa Face Workplace Violence
पणजी: गोमेकॉतील सामुदायिक पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थी डॉ. नादिया एन. एस. आर. गुदिन्हो आणि कम्युनिटी मेडिसीन विभागप्रमुख डॉ. जगदीश काकोडकर यांनी केलेल्या संशोधनानुसार, गोव्यातील ३८.५ टक्के डॉक्टर हिंसेचे बळी ठरले आहेत. ‘अ क्रॉस-सेक्शन स्टडी ऑन वर्कप्लेस व्हायलन्स अगेन्स्ट डॉक्टर्स इन गोवा, अ ग्रोविंग थ्रेट?’ या शीर्षकाखाली हा अभ्यास अहवाल प्रसिद्ध झाला आहे.
या संशोधनानुसार, गोव्यातील डॉक्टरांना मोठ्या प्रमाणात कार्यस्थळी हिंसेचा सामना करावा लागत असल्याचे उघड झाले आहे. या संशोधनातील निष्कर्ष ‘नॅशनल जर्नल ऑफ आयएपीएसएम हेल्थलाईन’च्या नव्या अंकात प्रसिद्ध झाले आहेत. हा अभ्यास डिसेंबर २०२३ मध्ये गोव्यातील २७० डॉक्टरांवर करण्यात आला होता. सहभागी डॉक्टरांना कमीत कमी एक वर्षाचा व्यावसायिक अनुभव असून त्यांनी ‘एमबीबीएस’पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. या डॉक्टरांकडून गुगल फॉर्मद्वारे माहिती संकलित करण्यात आली आहे.
गोव्यातील (Goa) डॉक्टरांवरील कार्यस्थळी हिंसा ही गंभीर समस्या असून युवा आणि शासकीय डॉक्टर याला अधिक बळी पडत आहेत. डॉक्टरांचे (Doctors) मानसिक आरोग्य आणि सामाजिक आयुष्य यांमुळे बाधित होत आहे. तथापि, रुग्णांच्या सेवांवर त्याचा मोठा परिणाम होत नसल्याचे आढळून आले आहे. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी धोरणात्मक पातळीवर तातडीने उपाययोजना राबविण्याची गरज देखील व्यक्त करण्यात आली आहे.
अपुऱ्या सुविधा व उपचार प्रक्रियेतील गैरसमज
प्रतीक्षाकाळ मोठा असणे
रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना आजार आणि उपचारांबाबत अपूर्ण माहिती
रुग्णालयातील सुरक्षा यंत्रणेतील त्रुटी
कायद्याची अंमलबजावणी करणे
डॉक्टर-रुग्ण संवाद सुधारणे
रुग्णालयात अधिक सुरक्षा उपाय योजणे
वैद्यकीय शिक्षणात बदल
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.