Chodan: ‘पोंटून’द्वारे काढणार बुडालेली फेरीबोट! डायव्हर्सच्या मदतीने 3 दुचाकी काढल्या बाहेर; कर्मचाऱ्यांचे जबाब नोंद

Chodan Ferryboat Incident: बोट बुडण्याची विविध कारणे सांगण्यात येत असली तरी मूळ कारण आता त्या बोटीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नोंदविलेल्या जबाबातून बाहेर येईल, असे दिसते.
Chodan Ferryboat Incident
Chodan Ferryboat IncidentDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: चोडण जेटीजवळ बुडालेली ‘बेती’ ही फेरीबोट काढण्याचे काम प्रत्यक्षात उद्या सुरू होईल. बोटीतील त्या तीन दुचाकी डायव्हर्सच्या मदतीने बाहेर काढण्यात आल्या. पोंटूनच्या साह्याने उद्या, बुधवारी फेरीबोट काढण्याचे काम सुरू होईल, असे नदी परिवहन खात्याचे संचालक विक्रमसिंह राजेभोसले यांनी ‘गोमन्तक''ला सांगितले.

सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास फेरीबोट बुडाली. बोट बुडण्याची विविध कारणे सांगण्यात येत असली तरी मूळ कारण आता त्या बोटीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नोंदविलेल्या जबाबातून बाहेर येईल, असे दिसते. मंगळवारी बोटीवरील कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू होते. ते जबाब उद्या, बुधवारी सचिवांकडे पाठविले जातील आणि त्यानंतर त्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Chodan Ferryboat Incident
Ro Ro Ferry: सोलर फेरी बंद झाली, रो-रो सेवा सुरु रहावी! चोडण- रायबंदर प्रवाशांची मागणी; 1 जुलैपासून होणार सुरवात

संचालक राजेभोसले यांनी सांगितले, की फेरीबोट काढण्यासाठी आवश्यक असणारे पोंटून उद्या, बुधवारी सकाळी हळदोणा येथून आणले जाणार आहेत. खासगी मालकाकडे ते असून, ते पोंटून आणल्यानंतर डायव्हर्सच्या मदतीने पोंटूनमध्ये हवा भरून ती बोट उचलण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याच्या मदतीला क्रेनही आणून ठेवण्यात आली आहे. पोंटूनच्या मदतीने फेरीबोट वर आल्यानंतर तिच्यातील पाणी उपसा करावा लागणार आहे.

Chodan Ferryboat Incident
Ferryboat Sinks In Goa: चोडण येथे फेरीबोट बुडाली; मोठा अनर्थ टळला

पोंटूनचा वापर?

बोटी तरंगत राहण्यासाठी पोंटूनचा वापर करतात. या पोंटूनचा वापर विविध क्रियाकलापांसाठी एक स्थिर व्यासपीठ बनविण्यासाठी केला जातो. त्यांचा वापर सामान्यतः कौटुंबिक सहली, मासेमारी, जलक्रीडा आणि मनोरंजन यासारख्या मनोरंजनात्मक हेतूंसाठी केला जातो. त्याशिवाय त्यांचा औद्योगिक क्षेत्रात उपयोग देखील होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com