गणेश विसर्जनासाठी म्हापसा नदी गाळमुक्त करण्याच्या कामाला सुरुवात; आमदार कार्लोस फरेरांचा पुढाकार

गणेश चतुर्थी जवळ येत असल्याने म्हापसा नदीतील भाग गाळ काढण्याचे काम काल (रविवार) सुरू करण्यात आले आहे
Mapusa River Cleaning
Mapusa River CleaningDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Mapusa River Cleaning: गणेश चतुर्थी जवळ येत असल्याने म्हापसा नदीतील गाळ काढण्याचे काम कालपासून (रविवार) सुरू करण्यात आले आहे. जलसंपदा विभागाने (WRD) नदीत मोठ्या प्रमाणात व्यापलेले तण काढून टाकण्यासाठी यंत्र कार्यान्वित केले आहे.

Mapusa River Cleaning
Kadamba Buses Without Conductor: आता कंडक्टरविना कदंबा! पण त्यांच्या नोकरीचं काय?

म्हापसा आणि परिसरातील लोक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी याच ठिकाणाचा वापर करतात. नदीतील गाळ काढणे आणि गणेश विसर्जनाचे मुख्य ठिकाण असलेले क्षेत्र मोकळे करणे हे काम वार्षिक उपक्रमाचा एक भाग आहे.

हळदोणाचे आमदार कार्लोस फरेरा यांनी काल स्थानिक लोकांसह नदीतील गाळ काढण्यासाठी पुढाकार घेतला.

यावेळी ते म्हणाले की, 'गणेश विसर्जन स्थळाच्या स्वच्छतेचा मुद्दा मी WRD मंत्री सुभाष शिरोडकर यांच्याकडे मांडला होता. पाण्यातील जलपर्णी साफ करण्यासाठी आम्हाला प्रथमच उभयचर यंत्र मिळाले आहे. आता गणेश विसर्जनासाठी नदीचा काही भाग गाळमुक्त करण्यात येणार आहे.'

WRD मंत्र्यांनी अलीकडेच विधानसभेच्या अधिवेशनात सांगितले होते की, म्हापसा नदीचा संपूर्ण भाग स्वच्छ केला जाईल आणि पावसाळ्यात गिरी आणि इतर भागात पूर येऊ नये यासाठी एक राखीव भिंत देखील बांधली जाईल.

दरम्यान, आमदार फरेरा म्हणाले की, म्हापसा नदीचे निर्जंतुकीकरण केल्यानंतर इतर विसर्जन स्थळांच्या निर्जंतुकीकरणाचे कामही हाती घेण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Mapusa Ganesh Idol Theft
Kashti Kale Drain Pollution
Goa Ganesh Immersion Safety 2026
Ganesh Chaturthi Spiritual Significance Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com