New Convention Centre in Goa : गोव्यात लवकरच पंचतारांकित हॉटेलसह कन्व्हेन्शन सेंटरची होणार उभारणी

गोव्यात जागतिक पर्यटनाचा दर्जा वाढवण्याच्या दृष्टीने सरकार अनेक पावले उचलत आहे.
New Convention Centre in Goa
New Convention Centre in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यात जागतिक पर्यटनाचा दर्जा वाढवण्याच्या दृष्टीने सरकार अनेक पावले उचलत आहे. याच संदर्भात अनेक वर्षांपासून चर्चेत असलेले पंचतारांकित हॉटेलसह कन्व्हेन्शन सेंटर अखेर दोना पावलाच्या परिसरात उभारणार आहे. यासाठीची निविदा आता मंजूर झाली आहे. पीपीपी तत्वाची ही निविदा New Consolidated Construction Co Ltd, Maiwir Engineering Pvt Ltd आणि Octmect Consultants LLPया कंपन्यांना मिळाली आहे. कंपनीने सरकारला 32 टक्के महसूलची हमी दिली असून मंत्रिमंडळाची याला मंजुरी असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. (New Convention Centre in Goa)

New Convention Centre in Goa
Old Borim bridge: बोरीचे अखेरचे अवशेष हटविले, मुक्ती लढ्याची आठवण पर्यटकांना पाहता येणार

या अत्याधुनिक कन्व्हेन्शन सेंटर बांधण्यात येणार असून 5000 पर्यंत आसन क्षमता असणार. त्याचबरोबर कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सुमारे 300 अत्याधुनिक खोल्या आणि 800 आसनक्षमतेसह मल्टीप्लेक्स थिएटर सुविधा असणार आहे.

या प्रकल्पासाठी मंत्रिमंडळाचची बैठक झाली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांसह पंचायतमंत्री माविन गुदिन्हो उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, ‘हे कन्व्हेन्शन सेंटर दोन वर्षांत उभारणे अपेक्षित आहे. यासाठी तीन कंपन्यांच्या एकत्रित निविदेला मान्यता दिली आहे. त्यांच्याकडून पंचतारांकित हॉटेलसाठी 27 टक्के तर कन्व्हेन्शन सेंटरसाठी 5 टक्के महसुलाची हमी मिळाली आहे. या हॉटेलमध्ये 300 अद्यावत खोल्यांचे पंचतारांकित हॉटेल असून दोन थिएटर, रेस्टॉरंट, सामान्य खोल्या असे अनेक छोटे प्रकल्प असतील.’

राज्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव स्थिरावल्यानंतर या कन्व्हेन्शन सेंटरची गरज भासत होती. तशी घोषणा यापूर्वी अनेकदा झाली होती. अखेर त्याला मुहूर्त मिळाला आहे. सरकारच्या या प्रकल्पामुळे पर्यटनाला नवीन दिशा मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com