Goa BJP: देशातील पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांपैकी चार राज्यांचे निकाल रविवारी 03 डिसेंबर रोजी जाहीर झाले. अनेक जागांवरील निकाल जाहीर झाले आहेत आणि जवळपास सर्व जागांवरील कल समोर आले आहेत.
त्यातून मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजप विजयाच्या दिशेने कूच करत असल्याचे चित्र आहे.
त्यामुळे देशभर भाजपच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू आहे. मग, त्यात गोव्यातील भाजप कार्यकर्तेही मागे कसे राहतील. भाजपच्या या यशाचा जल्लोष येथील कार्यकर्त्यांनी करायला सुरवात केली आहे.
मतमोजणीत भाजप आघाडीवर असल्याचे समोर येताच गोव्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंद साजरा केला.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि राज्यातील इतर भाजप नेत्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेचा पुन्हा विश्वास असल्याचे हे लक्षण आहे.
तेलंगणात काँग्रेस आघाडीवर आहे आणि भारत राष्ट्र समितीला सत्तेतून बेदखल करू शकते.
दरम्यान, भाजपच्या गोवा युनिटचे नेते या राज्यांतील पक्षाच्या निवडणूक प्रचाराचा भाग होते. त्यामुळेच चारपैकी तीन राज्यात भाजपने काँग्रेसला मागे टाकल्यावर भाजपचे कार्यकर्ते पणजीतील पक्षाच्या प्रदेश कार्यालयात पोहोचू लागले.
गोव्यातील राज्य पक्षाच्या मुख्यालयाबाहेर रस्त्यावर काही कार्यकर्त्यांनी फटाके फोडले आणि एकमेकांना मिठाई वाटली.
मुख्यमंत्री सावंत यांनी ट्विटरवर वर पोस्ट केले आहे की, "सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, मोदीजी का साथ."
गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, "हे यश पाहून माझे हृदय अभिमानाने भरून आले आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील अढळ विश्वास यातून दिसून येतो. ते आदर्श आणि जागतिक नेते आहेत."
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.