‘वुडन होम्‍स’ गोव्‍यात करणार विक्रम! 8 तासांपेक्षा कमी वेळेत बांधणार लाकडी कॉटेज; गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सचा ठोठावणार दरवाजा

Wooden Homes Goa: या अधिवेशनात ही कंपनी आठ तासांपेक्षा कमी वेळात ३४० चौरस फुटांचे पूर्णपणे तयार लाकडी कॉटेज बांधून गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये विक्रम करण्याचा प्रयत्न करेल.
Wooden Homes Goa
Wooden Homes GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: बांबोळी येथील डॉ. श्‍‍यामाप्रसाद मुखर्जी स्‍टेडियमवर येत्‍या ७ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या ३२ व्‍या अखिल भारतीय बिल्‍डर्स अधिवेशनात वुडन होम्‍स इंडिया कंपनी आठ तासांपेक्षा कमी वेळेत ३४० चौरस फुटांचे लाकडी कॉटेज बांधून विक्रम करण्‍याच्‍या प्रयत्‍नात असल्‍याची माहिती बिल्‍डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे (बीएआय) सहसंस्‍थापक अनिल खंवटे यांनी दिली.

रविवारी पणजीत घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काजू फेणी डिस्‍टीलर्स अँड बॉलटर्स असोसिएशनचे संस्‍थापक अध्‍यक्ष मॅक वाझ आणि वुडन होम्‍स इंडियाचे सिझर फर्नांडिस यावेळी उपस्‍थित होते.

भारतातील प्रीफॅब्रिकेटेड लाकडी बांधकामांमध्ये अग्रणी असलेली वुडन होम्स इंडिया कंपनी ७ ते ९ जानेवारी दरम्यान डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये आयोजित ३२ व्या अखिल भारतीय बिल्डर्स अधिवेशनात सहभागी होत आहे.

Wooden Homes Goa
Romeo Lane Illegal Shack: हडफडे घटनेनंतर सरकार 'ॲक्शन मोड'मध्ये! दोन कॅसिनोंचे परवाने रद्द, तर रोमिओ लेनच्या बेकायदा बांधकामावर हातोडा

या अधिवेशनात ही कंपनी आठ तासांपेक्षा कमी वेळात ३४० चौरस फुटांचे पूर्णपणे तयार लाकडी कॉटेज बांधून गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये विक्रम करण्याचा प्रयत्न करेल. हे बांधकाम ७ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता सुरू होईल. त्‍यामुळे उपस्थितांना आधुनिक बांधकामातील वेग, अचूकता आणि नाविन्य पाहण्याची संधी मिळेल, असे खंवटे यांनी सांगितले.

Wooden Homes Goa
Calangute Fire Incident: कळंगुटमध्ये मध्यरात्री अग्नितांडव, मच्छिमारांच्या दोन झोपड्या जळून खाक; 25 लाखांचे नुकसान

जोडणीपासून ते बांधकाम पूर्ण होईपर्यंतच्‍या संपूर्ण प्रक्रियेची नोंद गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सचे अधिकारी घेतील. त्‍यामुळे विक्रम प्रमाणीकरण नियमांचे काटेकोरपणे पालन होईल. या थेट प्रात्यक्षिकाचा उद्देश प्रीफॅब्रिकेटेड लाकडी घरांची कार्यक्षमता, टिकाऊपणा आणि अभियांत्रिकीची उत्कृष्टता अधोरेखित करणे हाच असल्‍याचे सिझर फर्नांडिस यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com