Calangute Fire Incident: कळंगुटमध्ये मध्यरात्री अग्नितांडव, मच्छिमारांच्या दोन झोपड्या जळून खाक; 25 लाखांचे नुकसान

Calangute: कळंगुट परिसरात मध्यरात्री भीषण आग लागून दोन झोपड्या जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Calangute Fire Incident
Calangute Fire IncidentDainik Gomantak
Published on
Updated on

कळंगुट: कळंगुट परिसरात मध्यरात्री भीषण आग लागून दोन झोपड्या जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही आग स्थानिक मच्छिमारांच्या झोपड्यांमध्ये लागली असून त्यामध्ये मासेमारीसाठी वापरले जाणारे डुंगा, जाळी तसेच इतर उपकरणे पूर्णपणे जळून गेली आहेत. अचानक लागलेल्या या आगीत क्षणातच झोपड्यांनी पेट घेतल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आगीची घटना घडताच पर्वरी, पिलेर्न आणि म्हापसा येथील अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. मात्र आगीचा वेग इतका प्रचंड होता की अग्निशमन दलाला ती आटोक्यात आणता आली नाही. परिणामी दोन झोपड्या आणि त्यामधील सर्व साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले.

Calangute Fire Incident
Goa Sand Mining: रेती परवाने रुतले CRZ मध्ये, NIO चा प्रतिकूल अहवाल; सरकारचे ‘सँडविच’, केंद्रीय मंत्रालयाने घातली बंदी

या आगीत मासेमारीसाठी लागणारी महत्त्वाची साधने जसे की डुंगा, जाळी तसेच जवळच्या झोपडीतील इलेक्ट्रॉनिक आणि घरगुती उपकरणेही पूर्णतः जळाली. या दुर्घटनेमुळे स्थानिक मच्छिमारांना मोठा धक्का बसला असून अंदाजे २० ते २५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आलीय.

Calangute Fire Incident
Goa Politics: सोमवारी होणार खातेवाटप, दामू नाईकांची स्पष्टोक्ती; अमावस्येमुळे निर्णय लांबल्याचा निर्वाळा

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आणि अधिकाऱ्यांनी घटनेची चौकशी सुरू केली आहे. या घटनेनंतर मच्छिमार समाजामध्ये चिंतेचे वातावरण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com