थिवीच्या मुक्तिधामातील लाकडे आगीत खाक

साडेतीन लाखाची नुकसान झाल्याचे मुक्तिधामाचे सचिव लवू कोरगांवकर यांनी सांगितले.
Fire
Fire Dainik Gomantak
Published on
Updated on

थिवी: माडेल-थिवी येथील मुक्तिधाम स्मशानभूमीच्या जळाऊ लाकडांच्या गोदामाला अज्ञात व्यक्तींनी आग लावल्याने गोदामात साठवून ठेवलेली तसेच गोदामाच्या बाहेर निवारा शेड मध्ये मांडून ठेवलेली अंदाजे दीड लाखाची लाकडे जळून खाक झाली असल्याची माहिती स्मशानभूमीचे अध्यक्ष चंद्रकांत साळगांवकर यांनी दिली.

एवढ्या मोठ्या प्रमाणात लाकडांना आग लागल्याने संपूर्ण गोदामाची तसेच निवारा शेडची नासधूस झाल्याने अतिरिक्त साडेतीन लाखाची नुकसान झाल्याचे मुक्तिधामाचे सचिव लवू कोरगांवकर यांनी सांगितले.

Fire
झुआरीनगरचे नागरिक पाणी बिलावरून संतप्त

आग लावण्याचा प्रकार 1 मार्च व 2 मार्च रोजी झाला. स्मशानभूमी समितीला मात्र याची माहिती 4 मार्च रोजी समजली. समितीचे सर्व सदस्य तसेच पंच सदस्य अर्जून आरोसकर, सुभाष कौठणकर यांनी स्मशानभूमीत जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. कित्येक वर्षांपासून सर्व सोयींनी युक्त असलेली स्मशानभूमी नव्हती. मोठा संघर्ष करीत आर.डी.ए. मार्फत या या स्मशानभूमीचे बांधकाम करण्यात आले होते. उंच भिंत तसेच मोठा लोखंडी दरवाजा असताना कोणी अज्ञात व्यक्तीने हे कृत्य केल्याबद्दल समितीने खेद व्यक्त करून कोलवाळ पोलिस स्थानकात याची रितसर तक्रार करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Valpoi Stray Dogs Survey
Konkani Essay Book Launch
Damone family six deaths
Santinez Footpath Damage Panaji
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com