CM Pramod Sawant- लैंगिक अत्याचार बहुतांशी ओळखीच्या लोकांकडून

लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी महिला पोलिसांद्वारे जागृती करणार - CM
Dr. Pramod Sawant
Dr. Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

राज्यात वाढत असलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांमूळे राज्यात आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांनी सरळ सरळ मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करत राज्यात घडत असलेल्या अत्याचाराच्या घटनांची नैतिक जबाबदारी स्विकारा असे ही म्हटले आहे.

(Women police will create awareness to prevent sexual harassment - CM Pramod Sawant)

Dr. Pramod Sawant
Goa Murder Case|दीड वर्षापूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला

राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज लैंगिक अत्याचाराच्या घटनांबाबत भाष्य केले असून राज्यशासन अशा घटना घडू नयेत यासाठी अधिक प्रयत्नशिल असणार आहे, असे ते यावेळी म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी याबाबत आणखी नवी संकल्पना राज्य सरकार सूरु करणार असल्याचं म्हटलं आहे.

Dr. Pramod Sawant
Bambolim: बांबोळीत दुकान गाळ्यांचा परिसर गलिच्छ

राज्यात लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी महिला पोलिसांद्वारे जागृती केली जाणार असून यामूळे समाजात अशा घटना घडू नयेत यासाठी अनुकूल स्थिती निर्माण करण्यासाठी मदत होणार असल्याचं ही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. तसेच महिलांनी अशा स्थितीत नेमके काय करायला हवे याची ही माहिती यावेळी होईल असे ही ते म्हणाले.

मुख्यमंत्री यावेळी बोलताना म्हणाले की, राज्यात घडत असलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार या घटनांचा विचार करता अशा घटनांमध्ये लैंगिक अत्याचार बहुतांशी ओळखीच्या लोकांकडून असे प्रकार घडत असल्याचं ही निरीक्षण त्यांनी नोंदवले आहे.

पोलिसांच्या कामामध्ये कोणताही हस्तक्षेप नाही -मुख्यमंत्री

गोव्यात सध्या वाढत्या गुन्हेगारीमुळे सरकार आणि गोवा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. मात्र कोविड नंतरच्या काळात ही गुन्हेगारी वाढली असून यात राज्याबाहेरील लोकांचा सहभाग असल्याचा दावा मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी केला आहे.

गोव्यात गुन्ह्यांच्या तपासाचा दरही देशात सर्वाधिक असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. पोलिसांच्या कामामध्ये आपण गृहमंत्री म्हणून कोणताही हस्तक्षेप करत नाही. त्यामुळे अन्य राजकारण्यांचा हस्तक्षेप असण्याचं कारण नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Cutbona jetty sanitation issues Goa
Mapusa Market Nullah Cleaning
Goa Assembly Elections 2027
Goa Human Trafficking
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com