Bambolim: बांबोळीत दुकान गाळ्यांचा परिसर गलिच्छ

वाटपाविना पडून राहिले: सरकारकडून वारंवार केवळ आश्‍वासनेच
shop
shopDainik Gomantak

पणजी: बांबोळी येथील हातगाडेधारकांच्या स्थलांतरासाठी बांधण्यात आलेल्या दुकान गाळ्यांचे हस्तांतरण न झाल्याने त्या ठिकाणी सध्या घाणीचे साम्राज्य दिसू लागले आहे. वाहने पार्क करून रात्रीचे मद्यपान करणारी मंडळी याठिकाणी दारूच्या व बिअरच्या रिकाम्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्या दररोज फेकून देतात. त्याशिवाय राहिलेले खाद्यपदार्थही फेकून देत असल्याने या परिसरात ठिकठिकाणी कचरा दिसून येत आहे.

(area of shops in Bamboli is dirty)

shop
Mandrem Sarpanch: मांद्रेच्या सरपंचपदी ॲड. अमित सावंत बिनविरोध

बांबोळी येथे व्यवसाय करणारे हातगाडे हटविल्यानंतर त्यांनी स्थलांतरासाठी आंदोलन केले. त्याची दखल घेत सरकारने जवळपास पन्नासच्यावर दुकान गाळे बांधले. ते दुकान गाळे गणेशोत्सवापूर्वी देणार असल्याचे आश्‍वासन जिल्हाधिकारी कार्यालयातून त्यांना मिळाले. असे आश्‍वासन यापूर्वीही दिले गेले होते. अद्याप दुकान गाळ्यांचे स्थलांतर होण्यासाठी गतीने हालचाली होत नसल्याने गाडेधारकांमध्ये नाराजी आहे. काही हातगाडेधारकांनी किमान भाडेपट्टी ठरवून तरी त्याचे हस्तांतर करावे अशी इच्छाही व्यक्त केली होती. भाडेपट्टी लागू झाली तर येथील पंचायतीला चांगल्याप्रकारे महसूलही मिळू शकतो.

व्यावसायिकांना प्रतीक्षा गाळेवाटपाची

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सरकारच्या स्वयंरोजगार योजनेतून चार गाडे घालण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार चार गाडे सुरू झाले आणि काही वर्षांत त्याठिकाणी ३० ते ३५ जणांनी वेगवेगळे व्यवसाय सुरू केले. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी होत होती. मागील वर्षी ते गाडे हटविण्यात आले. त्यामुळे सांताक्रूझ व सांत आंद्रेच्या तत्कालीन आमदारांना त्या हातगाडेधारकांची बाजू घ्यावी लागली. सरकारने दुकानगाळे बांधून तयार केले, पण त्यांचे वाटप केले नाही. त्यामुळे त्यांचे वाटप कधी होणार याकडे गाडेधारकांचे लक्ष लागून आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com