Waste Water:
Waste Water: Dainik Gomantak

Goa Accident Death: स्मार्ट सिटी पणजीत बळी मळा-गटारात पडून वृद्ध मृत्‍युमुखी

Goa Accident Death: मळा-पणजी येथील उघड्या गटारात पडून महादेव चोडणकर (६५) यांचा मृत्यू होण्‍याची घटना आज बुधवारी सायंकाळी घडली.
Published on

Goa Accident Death: मळा-पणजी येथील उघड्या गटारात पडून महादेव चोडणकर (६५) यांचा मृत्यू होण्‍याची घटना आज बुधवारी सायंकाळी घडली. महापालिकेचे या उघड्या गटारांकडे अक्षम्‍य दुर्लक्ष होत असल्‍याचे पुन्‍हा एकदा आजच्‍या घटनेवरून ठळकपणे समोर आले आहे.

यापूर्वी ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पासाठी खोदलेल्या खड्ड्ड्यात पडून एका दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाला होता. दरम्‍यान, या दुर्घटनेशी स्‍मार्ट सिटी कामांचा संबंध नाही असा खुलासा इमॅजिन पणजीने केला आहे.

महादेव चोडणकर यांचा भाड्याने गाड्या देण्याचा व्यवसाय आहे. मळा येथील रहिवाशी असलेले चोडणकर आज सायंकाळी पावणेसहाच्‍या सुमारास स्कूटरवरून घरी जात होते. घरापासून जवळच अंतरावर उघडे गटार आहेत. तोल जाऊन ते त्‍या गटारात पडले.

Waste Water:
Goa Politics: विरोधकांना काढले सभागृहाबाहेर

त्यांचा पाय गाडीखाली अडकला आणि ते गटारातील पाण्यात गुदमरले. ही घटना पाहिलेल्यांनी लगेच 108 रुग्णवाहिका मागविली. मात्र गोमेकॉत नेत असताना वाटेतच चोडणकर यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या मागे पत्नी व मुलगा असा परिवार आहे. दरम्‍यान, यापूर्वी, नवीन वर्षाच्‍या पहाटेच ‘स्‍मार्ट सिटी’च्‍या खड्ड्यात पडून एका युवकाला आपला प्राण गमवावा लागला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com