Bicholim News: समाज घडविण्यास महिला सक्षम

डॉ. स्नेहा गीते : डिचोलीत ‘कला अस्तुरी’ महोत्सवाला उदंड प्रतिसाद
Bicholim News
Bicholim NewsDainik Gomantak
Published on
Updated on

शिक्षणासह प्रत्‍येक क्षेत्रात आज महिला पुढे येत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. संसार आणि कुटुंब सांभाळतानाच समाज घडविण्याचे सामर्थ्य केवळ महिलांमध्येच आहे, असे मत कारखाने आणि बाष्पक खात्याच्या मुख्य निरीक्षक डॉ. स्नेहा गीते यांनी व्यक्त केले. ‘कला अस्तुरी’ महोत्सवात त्‍या प्रमुख पाहुण्या या नात्याने बोलत होत्या.

डिचोली शिक्षा व्हिजनतर्फे येथील हिराबाई झांट्ये सभागृहात हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिक्षा व्हिजनचे अध्यक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप रेवोडकर, मुळगाव सरपंच तृप्ती गाड, ‘कला-अस्तुरी’च्‍या समन्वयक शुभा दीक्षित, सुहासिनी शेट्ये, अडवलपाल सरपंच सुबत्ता सामंत आदी उपस्थित होते.

कुटुंबातील सदस्यांसाठी वेळ देणाऱ्या महिलांनी आपल्यासाठीही वेळ काढला पाहिजे. वेळेवर आहार घेऊन त्‍यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. पुरुषांनीही महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन डॉ. गीते यांनी केले.

Bicholim News
Sanquelim News: विर्डीत आजपासून कळसोत्सव

प्रारंभी केशव सेवा साधना विशेष शाळेच्या मुलांनी ‘माणसाने माणसाशी माणसासम वागावे’ यासह स्वागतगीत सादर केले. तर, फेरीलँड शाळेच्या छोट्या मुलांनी नृत्य सादर केले. डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात कला अस्तुरी महोत्सव आयोजन करण्यामागील हेतू सांगितला. दिलीप धारगळकर यांनी सूत्रसंचालन केले तर रक्षदा पळ यांनी आभार मानले.

Bicholim News
Bicholim News: लाडफेतील कळसोत्सवाची सांगता

महिलांचा सन्मान

‘कला अस्तुरी’ महोत्सवात पाककला, केशरचना, पुष्पहार गुंफणे, दिंडी, फुगडी आदी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्‍या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.

त्‍यात आनंदी वासुदेव परब, सुधाबाई तानाजी पळ, निर्मला शेटगावकर, सत्यवती चननकर, न्यायाधीश विजयालक्ष्मी शिवोलकर, लिलावती परवार, स्मिता हिंदे, मनीषा पणजीकर, शिल्पा गावकर, सुवर्णा परब, मीनाक्षी लोकरे, अरुणा वाडकर आणि सीता रामा परब यांचा समावेश होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com