Sanquelim News: विर्डीत आजपासून कळसोत्सव

शुक्रवारी होमकुंड : चार दिवस चालणार सातेरी शांतादुर्गेचा उत्सव
Sanquelim News
Sanquelim NewsDainik Gomantak
Published on
Updated on

विर्डी-साखळी येथील श्री सातेरी शांतादुर्गा देवीच्या कळसोत्सवाला उद्या मंगळवार दि. 14 मार्चपासून प्रारंभ होत आहे. चार दिवस चालणाऱ्या या उत्‍सवात शुक्रवार दि. 17 रोजी गावातील महादेव मंदिरासमोर वर्षपद्धतीप्रमाणे भव्य होमकुंड उत्सव साजरा करण्यात येणार आहे. विर्डी गावच्या 13 दिवसीय शिगमोत्सवाची सांगता होमकुंडाने होणार आहे.

शिगमोत्सवात नवव्या दिवशी सकाळी गावात घोडेमोडणी, तोप व नंतर धुळवड साजरी करण्‍यात येते. त्‍यानंतर संध्याकाळी श्री महादेव मंदिरातून श्री सातेरी शांतादुर्गा देवीचा कलश वाजतगाजत भाविकांच्या उपस्थितीत बाहेर काढला जातो.

उद्या मंगळवारी संध्याकाळी 4 वाजता देवीचा कलश गाऱ्हाणे घालून मंदिरातून बाहेर काढण्यात येईल. सर्वप्रथम मानाच्या देवतांना भेटी देऊन संध्याकाळी गावकरवाडा येथील मानाच्या घरांना तो भेट देणार आहे. गावकरवाडा येथील पुरोहित सुदेव परांजपे यांच्या निवासस्थानी कलशाचे वास्तव्य असेल.

बुधवार दि. 15 रोजी सकाळी जल्मीवाडा येथील घरोघरी कलश फिरेल. संध्याकाळी ४ वाजता परबवाडा येथील घरांमध्ये कलश फिरून सावळवाडा येथे गावची खुटी येथे भेट देऊन तीर्थ देणार आहे. त्यानंतर रात्री च्यारीवाडा-विर्डी येथील समीर च्यारी यांच्या निवासस्थानी कलशाचे वास्तव्य असेल.

गुरुवार दि. 16 रोजी च्यारीवाडा येथील समीर च्यारी यांच्या निवासस्थानी दुपारी महाप्रसाद, संध्याकाळी कलश कारेखाजन येथे घरोघरी जाईल. तसेच श्री देव क्षेत्रपाल, भूमिका देवस्‍थानला भेट देणार आहे.

रात्री 10 वाजता कारेखाजन येथे कौलोत्सव होईल. त्यानंतर शितळाई देवीला भेट देऊन तीर्थ दिले जाईल. रात्री पूर्ववत पुरोहित सुदेव परांजपे यांच्या निवासस्थानी कलशाचे वास्तव्‍य असेल.

Sanquelim News
Tourist Attacked in Goa:पर्यटक प्राणघातक हल्ला प्रकरण: मुख्‍यमंत्र्यांच्‍या भूमिकेचे स्‍वागत

कलशाच्‍या घरोघरी भेटी व कौलोत्‍सव

शुकवार दि. 17 रोजी चौथ्या दिवशी सकाळी कलश धाटवाडा येथील घरोघरी भेट देणार आहे. सायंकाळी च्यारीवाडा येथील घरांना भेटी देऊन झाल्यानंतर तेथे कौलोत्सव होईल.

त्यानंतर घाडीवाडा येथील घरांना भेटी व कौलोत्सव, तत्पूर्वी घाडीवाडा येथे जाताना वाटेत व्याघ्रेश्वर देवाला कौल, घाडीवाडा येथे कौल दिल्यानंतर रात्री कलश भाटातून पारंपरिक वाटेने महादेव मंदिराजवळ येईल.

Sanquelim News
Goa SSC HSC: 10वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; येत्या वर्षापासून एकच अंतिम परीक्षा

तेथे रचून ठेवण्यात आलेल्या होमकुंडाला वळसा घालून देवीचा कलश देऊळवाडा येथील घरांना भेटी देणार आहे. त्‍यानंतर वाजतगाजत सर्व व्रतस्थ धोंडगणांच्या साथीने कलश होमकुंडस्थळी आणला जाईल.

होमकुंडाला प्रदक्षिणा मारून देवी होमकुंडाला अग्नी देऊन सर्व धोंडगण कलशासह श्री सातेरी शांतादुर्गा मंदिराजवळील तळीवर स्‍नानासाठी जातील.

पहाटे सर्व धोंडगण व नंतर देवीचा कलश डोक्यावर धरलेला मोडपुरूष होमकुंड मार्गक्रमण करेल. नंतर महादेव मंदिराच्या मंडपात सामूहिक कौलोत्सव होऊन देवीचा कलश पूर्ववत मंदिरात प्रवेश करेल व उत्सवाची सांगता होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com