Pernem:...अन्यथा मोपा-चांदेल मार्गावर रास्ता रोको; पाण्यासाठी महिला बनल्या रणरागिणी

नागझरमध्ये तीव्र पाणी टंचाई
Water Scarcity
Water Scarcity Dainik Gomantak

नागझर-पेडणे येथे गेल्या महिनाभरापासून नागरिकांना पाणीपुरवठा होत नाही. याच पार्श्वभूमीवर आज न्यूवाडा-नागझर येथील महिलांनी रस्त्यावर उतरून पाणीपुरवठा विभागाविरोधात निदर्शने केली. चार दिवसांत पाणी पुरवठा सुरळित न केल्यास मोपा - चांदेल मार्गावर रास्ता रोको करणार असल्याचा इशारा आंदोलनकर्त्या महिलांनी पाणीपुरवठा विभागाला दिला आहे.

नागझर ते वारखंडपर्यंत जुन्या जलवाहिनीच्या जागी नवीन मोठी जलवाहिनी घालण्याचे काम 04 ऑक्टोबरला संध्याकाळी सुरू केले होते, तेव्हापासून खोदकाम करताना अधूनमधून सतत जुनी जलवाहिनी फुटत आहे. आमच्या घरातील महिला आजारी आहेत, काही महिलांना पाणी मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. टँकरमधील पाणी ठराविका लोकांनाच मिळत आहे. अनेक घरात पाणी मिळत नाही, त्यामुळे त्वरित नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा अशी मागणी या महिलांनी केली.

Water Scarcity
Govt servants: बार्देश, सासष्टीत सर्वाधिक 'सरकारी बाबू', लोकसंख्येच्या तुलनेत सत्तरी अव्वल

एका बाजूने रस्त्याचे खोदकाम मोठ्या प्रमाणात चालू असल्याने सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या धुळीचा सामना आम्हाला करावा लागतोच, शिवाय दुसऱ्या बाजूने पाण्यासाठी वणवण करावी लागते. आजारी महिलांना पाण्यासाठी दूरवर जावे लागते याचे सरकारला काहीच पडलेले नाही का? प्रकल्पांसाठी पाणी देणाऱ्या सरकारने सर्वसामान्यांचाही विचार करावा, अशी मागणी यावेळी संतप्त महिलांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com