Govt servants: बार्देश, सासष्टीत सर्वाधिक 'सरकारी बाबू', लोकसंख्येच्या तुलनेत सत्तरी अव्वल

मुरगाव आणि सांगे तालुक्यात सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या सर्वात कमी
Goa Government Employees
Goa Government EmployeesDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Government Employees: सरकारी नोकरीसाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. सन्मान, प्रतिष्ठा, सरकारी सुविधा आणि भरपूर पगार यामुळे तरूण नेहमीच सरकारी नोकरीच्या मागे धावताना दिसतात. गोव्यातील तालुकानिहाय सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या पाहिली असता बार्देश, सासष्टी आणि तिसवाडी तालुक्यात सर्वाधिक 'सरकारी बाबू' आहेत. तर, लोकसंख्येच्या तुलनेत सत्तरी तालुका अव्वल आहे. 63,817 लोकसंख्या असलेल्या सत्तरीत 4,466 म्हणजेच सात टक्के सरकारी कर्मचारी आहेत.

Goa Government Employees
गोव्यात पहिली सोलर बोट लॉन्च; सुरुवातीच्या 15 दिवसांसाठी मोफत प्रवास

सरकारनेच केलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या सर्वेक्षण अहवालातून गोव्यातील सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या समोर आली आहे.

गोव्यात 63 हजार 162 सरकारी कर्मचारी सेवा बजावत आहेत. यामध्ये बार्देश, सासष्टी, तिसवाडी आणि फोंडा या तालुक्यातील सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. बार्देशची लोकसंख्या 2,37,440 एवढी असून, त्यापैकी 9,738 (4 टक्के) लोक सरकारी सेवेत आहेत. सासष्टी तालुक्याची लोकसंख्या 2,94,464 असून, 9,576 (3 टक्के) लोक सरकारी सेवेत आहेत. तसेच, तिसवाडीची लोकसंख्या 1,77,219 एवढी असून, 8,693 (4 टक्के) नागरिक सरकारी सेवा बजावतात. फोंड्यात देखील 1,65,830 लोकसंख्येपैकी 8,413 (5 टक्के) जण सरकारी सेवेत आहेत.

Goa Government Employees
AYUSH Hospital: 8 डिसेंबर रोजी आयुष हॉस्पिटलचे उद्घाटन करणार; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

लोकसंख्येशी तुलना केल्यास सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये सर्वाधिक टक्केवारी सत्तरी, पेडणे, डिचोली आणि केपे तालुक्यात आहे. तर, मुरगाव आणि सांगे तालुक्यात सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या सर्वात कमी आहे. मुरगावची लोकसंख्या 1,54,561 एवढी आहे. त्यांतील 3,628 (2.30 टक्के) लोक सरकारी कर्मचारी आहेत. तसेच, सांगेची लोकसंख्या 65,147 एवढी असून, त्यापैकी 1,702 (2.61टक्के) लोक सरकारी सेवेत आहेत.

सरकारी सेवेसाठी धडपड करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढती बेरोजगारीमुळे उच्चशिक्षित तरूण मिळेल त्या कामासाठी अर्ज करताना दिसत आहेत. तसेच, एखादी सरकारी जागा निघाल्यास लाखोंच्या संख्येने अर्ज केले जातात. गोव्यातील आकडेवारीवरून राज्यातील तरूणाचा सरकारी नोकरीकडे जास्त कल असल्याचे दिसून येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com