Goa Accident: छत्रीमुळे गेला जीव! स्कुटरवरून पडून महिलेचा दुर्दैवी अंत

Goa Scooter Accident: बोकडामोळ, आगोंद येथे मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे स्कूटरवरून पडून ५३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला
umbrella caused accident
umbrella caused accidentDainik Gomantak
Published on
Updated on

काणकोण: गोव्यातील काणकोण तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. बोकडामोळ, आगोंद येथे मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे स्कूटरवरून पडून ५३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. हा अपघात शुक्रवारी (दि.४ जुलै) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडला.

छत्री उघडणे ठरले जीवघेणे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत महिला आपल्या पतीसोबत स्कूटरवरून जात होती. पाऊस आणि वाऱ्यापासून वाचण्यासाठी महिलेने अचानक छत्री उघडली. याच दरम्यान, छत्री वाऱ्याने ओढली गेल्यामुळे तिचा तोल सुटला आणि ती स्कूटरवरून खाली पडली. या अपघातात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

umbrella caused accident
Goa Accident: बस नसल्याने लिफ्ट घेतली अन् मद्यधुंद ट्रक चालकाने धडक दिली; महिला सुरक्षा रक्षक जागीच ठार

उपचारादरम्यान अखेरचा श्वास

अपघातानंतर महिलेला तातडीने काणकोण येथील कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने तिला पुढील उपचारांसाठी मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तिथेही तिच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिला बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवण्यात आले. दुर्दैवाने, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पावसाळ्याच्या दिवसांत छत्रीचा वापर करताना विशेष काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे, हे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. पोलीस उपनिरीक्षक रामदास दोईफोडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com