राखीच्या धाग्यानेच आवळला गळा! मानलेल्या बहिणीने भावाला लावला 5.7 लाखांचा चुना, अडकवले भावनिक जाळ्यात

Woman Cheats Neighbor 5.72 Lakh: भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा गैरफायदा घेत एका महिलेने आपल्या शेजाऱ्याची तब्बल ५.७२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Woman Cheats Neighbor 5.72 Lakh
Woman Cheats Neighbor 5.72 LakhDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा गैरफायदा घेत एका महिलेने आपल्या शेजाऱ्याची तब्बल ५.७२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ‘राखी’ बांधून विश्वासाचे नाते निर्माण करत भावनिक जाळे विणणाऱ्या या महिलेविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आदेश न्‍यायालयाने दिले आहेत.

तक्रारदार सत्यवान विठ्ठल आमोणकर हे शिरसई येथे वास्तव्यास असून, ते लहान हॉटेल व्यवसाय करतात. २०२० च्या सुमारास तेरेझा अराऊजो ऊर्फ स्वाती हळदणकर ही महिला त्यांच्या शेजारी भाड्याने राहण्यास आली. काही दिवसांतच तिने आमोणकर कुटुंबाचा विश्वास संपादन केला.

Woman Cheats Neighbor 5.72 Lakh
Illegal Fishing Goa: परराज्‍यांतील 13 ट्रॉलर्स जप्‍त, गोव्‍याच्‍या समुद्रात घुसखोरी; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना 10 लाखांपर्यंत दंड

‘‘आपल्याला कोणीही नाही. पतीने सोडून दिले आहे. तसेच दागिने घेऊन तो फरार झाला आहे’’ अशा बनावट कहाण्या सांगून तिने सहानुभूती मिळवली. त्यानंतर सत्यवान आमोणकर यांना राखी बांधून ‘भाऊ’ मानल्याचे नाते जोडले आणि याच नात्याच्या आडून वारंवार पैशांची मागणी सुरू केली. आमोणकर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असून त्यांना एक दिव्यांग मुलगी आहे. तरीही महिलेच्या भावनिक सादेला बळी पडत कुटुंबाने स्वतःचे सोन्याचे दागिने गहाण ठेवले, खासगी सावकारांकडून जादा व्याजाने कर्ज घेतले आणि त्यांच्या दिव्यांग मुलीच्या बचत खात्यातील पाच हजार रुपयेही काढून तिला दिले.

Woman Cheats Neighbor 5.72 Lakh
Goa Mining: विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात खाणकाम जोरात! 24 ठिकाणी खनिजाचा महालिलाव; सरकारला सुरुवातीलाच मिळणार 200 कोटींचा महसूल

जून २०२१ पर्यंत ही रक्कम व्याजासह ५ लाख ७२ हजार १०० रुपयांपर्यंत पोहोचली. मात्र, पैसे परत मागितल्यावर संबंधित महिलेने टाळाटाळ सुरू केली. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे आमोणकर यांच्या लक्षात आले.

त्‍यानंतर आमोणकर यांनी सुरुवातीला म्हापसा आणि नंतर कोलवाळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. मात्र, पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अखेर त्यांनी न्यायालयात धाव घेतली.

न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत तक्रारीत दखलपात्र गुन्ह्याचे स्पष्ट स्वरूप दिसत असल्याचे नमूद केले. त्यानुसार फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १५६(३) अंतर्गत कोलवाळ पोलिसांना तत्काळ एफआयआर नोंदवण्याचे आदेश देण्यात आले. तसेच ३० दिवसांच्या आत तपास अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com