Woman died in fire: धक्कादायक! देव घरातील दिवा पेटवताना साडीला आग,महिलेचा भाजून मृत्यू

कुंकळ्ळी येथे घडली घडना
Hospital
Hospital Dainik Gomantak

फातोर्डा: कुंकळ्ळी येथे एका महिलेचा राहत्या घरात आग लागून भाजल्याने मृत्यू झाला असल्याची झाल्याची घटना घडली आहे. याबाबतची माहिती कुंकळ्ळी पोलिसांनी दिली आहे. संबंधीत महिला देवघरात दिवा लावताना हा प्रकार घडला आहे.

(Woman burns to death while lighting lamp to god at Cuncoliem)

Hospital
Mapusa Water Bills Issue: वीजबिलानंतर आता पाणी बिलाचा घोळ; लाखो रुपयांची बिले येत असल्याचा आरोप

मिळालेल्या माहितीनुसार कुंकळ्ळी येथे सुमन गडेकर (62) या आपल्या घरातील देवघरात दिवा लावत असताना गडेकर यांच्या अंगावर असलेल्या कपड्यांना ही आग लागली. या आगीत त्या जास्त प्रमाणात भाजल्या गेल्या. यावेळी काही वेळातच स्थानिकांनी लागलेली आग विझवत गडेकर यांनी आगीतून बाहेर काढले.

Hospital
Chandrakant Shetye Statement: खोलपेवाडीत ग्रामीण वाचनालय सुरु करु

थोड्याच वेळात गडेकर यांना मडगाव येथील जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यसाठी रुग्णवाहिका बोलवली दरम्यान वाटेवर गडेकर यांचे निधन झाले. हा मृतदेह सध्या मडगाव येथील जिल्हा रुग्णालयात शवागृहात ठेवण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत घटनास्थळी धाव पंचनामा करण्यात येत आहे. अशी माहिती समोर आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com