Mapusa Water Bills Issue: वीजबिलानंतर आता पाणी बिलाचा घोळ; लाखो रुपयांची बिले येत असल्याचा आरोप

अन्यथा न्यायालयाची वाट धरु...
Mapusa water Bill
Mapusa water BillDainik Gomantak

गेल्या काही दिवसांपुर्वी मांद्रे येथील एका व्यक्तीला विज वितरण विभागाने तब्बल 57 लाख रुपये विजबिल पाठवले होते. संबंधित व्यक्तीने याची माहिती माध्यमांना दिली. तसेच याची माहिती विज विभागाला दिल्यानंतर मात्र यात दुरुस्ती करण्यात आली. यानंतर आता म्हापसा येथे पाणी बिलाचा घोळ असल्याची तक्रार करत नागरीकांनी संताप व्यक्त केला आहे.

(Mapusa Citizens will file a complaint in court as the water bills are getting higher)

Mapusa water Bill
Goa Crime News: अल्‍पवयीन मुलीचा विनयभंग; तरुणास स्‍थानिकांकडून चोप

मिळालेल्या माहितीनुसार वीजबिल घोळानंतर आता म्हापसा येथील नागरिक असेलेल्या नरेंद्र सुतार यांनी आपल्यासह अनेक नागरीकांना लाखो रुपयांची बिले आकारली जात आहेत. असे म्हटले आहे. यावर काय करावे हे सामान्य नागरीकांना मोठा प्रश्न पडला आहे. त्यामुळे आम्ही न्यायालयात तक्रार दाखल करणार असल्याचे सुतार यांनी म्हटले आहे. यावर पाणी विभागाने अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

Mapusa water Bill
Casinos in Mandovi: मांडवीतील कॅसिनो आणि थकीत वीज बिलाबाबत गोवा मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

म्हापसा येथे घडत असलेल्या या प्रकारांमुळे स्थानिक त्रस्त झाले आहेत. सुतार यांनी केलेल्या तक्रारीनुसार पाणी मिटरच्या रिडिंगमध्ये घोळ आहे. त्यामुळे मासिक बिले ही लाखो रुपयांची येत असल्याची माहिती माध्यमांना दिली आहे.

सुतार म्हणाले की, या समस्येवरुन आम्ही शाश्वत उपायाच्या शोधात आहोत. पाणी विभागाने याची दखल घेत नागरीकांच्या समस्या दुर करणे आवश्यक आहे. मात्र पाणी विभागाने तसे न केल्यास आम्ही थेट न्यायालयाचा रस्ता धरु असा इशारा उपस्थित नागरीकांनी दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com