

पणजी: केंद्रीय अधिकारी असल्याचे भासवून यड्राव (कोल्हापूर) येथील उद्योजकाची तब्बल १ कोटी २५ लाख ७७ हजार ३४७ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सव्वादोन वर्षांपासून फरार असलेली मुख्य संशयित महिला वैशाली राया मांजरेकर (४३, आल्तिनो-पणजी) हिला शहापूर पोलिसांनी अटक केली.न्यायालयाने तिला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
तपासात वैशाली मांजरेकर ही या बहुचर्चित फसवणूक प्रकरणातील प्रमुख सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर ती फरार झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार.
, शहरातील अशाच प्रकारच्या आणखी दोन फसवणूक प्रकरणांतही तिचा सहभाग असल्याचा संशय असून त्या गुन्ह्यांमध्येही तिची चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणातील फिर्यादी उद्योजक संतोष पाटील यांना केंद्रीय भांडार, गोवा येथे स्टेशनरी साहित्य पुरवठ्याचे टेंडर मिळवून देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते.
फसवणूक प्रकरणानंतर फरार झालेली वैशाली मांजरेकर हिला मुंबईतील एका गुन्ह्यात अटक झाली होती. ही माहिती मिळाल्यानंतर शहापूर पोलिसांनी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून तिचा ताबा घेतला. शहरातील आणखी दोन फसवणूक प्रकरणांत तिचा सहभाग असल्याचा संशय आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.