New Zuari Bridge : नवीन झुआरी पुलावर 'या' कालावधीत विना वाहन फिरण्यास मुभा

पुल वाहनांसाठी 29 डिसेंबर रोजी खुला करण्यात येणार
New Zuari Bridge
New Zuari BridgeDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

नवीन झुआरी पुलाचे उद्घाटन काही कारणांमुळे पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली होती. 29 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन होणार आहे. दरम्यान, आता नाताळच्या पार्श्वभूमीवर 25 ते 28 डिसेंबर या कालावधीत विनावाहन फिरता येणार आहे. स्थानिक आणि पर्यटकांना विनावाहन फिरण्यास मुभा देण्यात आली आहे. तर वाहनांसाठी 29 डिसेंबर रोजी खुला करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी आज सायंकाळी नवीन पुलाची पाहणी केली यावेळी त्यांनी याबाबतची माहिती दिली.

New Zuari Bridge
Colva : खासगी व्हिलामध्ये विदेशी पर्यटकाची आत्महत्या; दोन दिवसांतील दुसरी घटना

जसा अटल सेतूचा नागरीकांनी आनंद घेतला तसा नवीन झुआरी पुलाचाही लोकांनी आनंद घ्यावा. नागरिकांनी दोन्ही बाजूंनी मेन रोडवरुनच यावे. ब्रिजपर्यंत बॅरीगेटींग केले जाणार आहे. नागरीकांनी आपली वाहने पुलाच्या अगोदर पार्क करावीत. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

"नाताळ सणाच्या आनंदी प्रसंगी मी तुम्हा सर्वांना नवीन झुआरी पुल एक्सप्लोर करण्यासाठी आमंत्रित करतो. 25 ते 28 डिसेंबर 2022 या कालावधीत सायंकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत हा पूल पादचाऱ्यांसाठी वाहनांच्या वाहतुकीशिवाय खुला राहील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Zuari River
Enemy Property Case Goa
Goa Dairy management takeover by NDDB
Goa Olympic Association election
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com