Suicide Case | Goa News
Suicide Case | Goa News Dainik Gomantak

Colva : खासगी व्हिलामध्ये विदेशी पर्यटकाची आत्महत्या; दोन दिवसांतील दुसरी घटना

दोन दिवसांपूर्वी मूळ अमेरिकन नागरिकाचा आढळला होता मृतदेह
Published on

बेताळभाटी येथे एका खासगी व्हिलामध्ये ब्रिटिश पर्यटकाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार कोलवा पोलिस स्थानकाच्या हद्दीत घडला आहे. दोन दिवसांपूर्वी एका विदेशी नागरिकाचा मृतदेह कोलवा पोलिस स्थानकाच्या हद्दीत आढळून आला होता. मृत मूळ अमेरिकन नागरिक होता तसेच तो एका निवासी हॉटेलमध्ये राहत होता.

बेताळभाटी येथे एका खासगी व्हिलामध्ये उतरलेल्या ब्रिटिश पर्यटकाने राहात्या खोलीतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार कोलवा पोलिस स्थानकाच्या हद्दीत घडला आहे.

Suicide Case | Goa News
Panjim Court : हत्येच्या आरोपातून इस्रायलच्या डुडूची निर्दोश मुक्तता

याबाबत अधिक माहिती अशी की, डेनियल ग्रीन (५४) असे या विदेशी नागरिकाचे नाव असून तो ब्रिटनहून आपल्या पत्नी समवेत २२ डिसेंबरला ख्रिसमस साजरा करण्यासाठी गोव्यात दाखल झाला होता. या विषयी माहिती देताना कोलवा पोलिसांनी सांगितले कि, या मयताची दोन लग्ने झाली होती. यातील एका बायकोकडून त्याला त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे तो निराश होता. अशातच त्याने आपले जीवन संपविले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या विषयी माहिती मिळताच कोलवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृताचा पंचनामा करून शव जिल्हा हॉस्पिटलच्या शवगृहात ठेवण्यात आले आहे. या प्रकरणी कोलवा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक थेरोंन डिकॉस्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत आहे.

Suicide Case | Goa News
Goa Taxi App : जीटीडीसीच्या टॅक्सी नोंदणीकडे पेडणेवासीयांची पाठ; स्थानिकांच्या संयमाचा अंत पाहू नका, अन्यथा...

कोलवा पोलिस स्थानकाच्या हद्दीतील एका निवासी हॉटेलमध्ये विदेशी नागरिकाचा मृतदेह आढळून आला होता. मूळ अमेरिकन नागरिक असलेल्या या व्यक्तीचे रॉबर्ट कार्लोस दुमास (82) असे नाव आहे. कोलवा येथील निवासी हॉटेलच्या रूममध्ये रॉबर्ट अत्यवस्थ अवस्थेत आढळल्याने त्यांना मडगाव येथील जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कोलवा पोलिसांनी याबाबतची माहिती दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com