State Government: ऑनलाईन सेवांमुळे कामांना गती

State Government: मुख्‍यमंत्री : वाजपेयींना जयंतीनिमित्त आदरांजली
Central Government Schemes in Goa | CM Pramod Sawant
Central Government Schemes in Goa | CM Pramod SawantDainik Gomantak

State Government: सुशासन हे राज्य सरकारचे काम करण्याचे सूत्र आहे. माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांनी सुशासनाचा पाया रचला आणि त्याच मार्गावर पुढे भाजपचे केंद्रातील व राज्यातील सरकार मार्गक्रमण करत आहे. त्‍यांनी अखंड भारताचे स्‍वप्‍न पाहिले होते.

Central Government Schemes in Goa | CM Pramod Sawant
MP Francis Sardin: मला पाचव्‍यांदा लोकसभेत पाठवा

आता राज्य सरकारने जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध केल्याने लोकांची सरकार दरबारी कामे खोळंबून राहणे बंद झाली आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज पर्वरी येथे सांगितले.

अटल बिहारी वाजपेयी यांच्‍या जयंतीनिमित्ताने सचिवालयात त्यांच्या तसबिरीला पुष्पहार अर्पण केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले, अखंड भारताचे स्वप्न वाजपेयींनी पाहिले. ‘अबकी बार अटल बिहारी’ असा नारा दिला जात होता.

Central Government Schemes in Goa | CM Pramod Sawant
South Goa: द. गोव्‍यात ‘पोक्‍सो’अंतर्गत जलदगती न्‍यायालयाची गरज

त्यांना घटनेतील ३७०वे कलम हटवायचे होते, अयोध्या येथे राममंदिर बांधायचे होते. त्यांची ती स्वप्ने आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पूर्ण केली आहेत.

यावेळी केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, खासदार सदानंद शेट तानावडे, मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल, पोलिस महासंचालक जसपाल सिंग व अन्य वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते. जनतेला चांगली सेवा देण्याची शपथ या निमित्ताने घ्यावी असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

या कार्यक्रमानंतर भाजपच्या कार्यालयात मुख्यमंत्री व तानावडे यांनी वाजपेयी यांना आदरांजली वाहिली. भाजपच्या दक्षिण गोवा कार्यालयात प्रदेश सरचिटणीस दामोदर नाईक व आमदार दिगंबर कामत यांनी वाजपेयींना आदरांजली वाहिली.

सुशासनाचा ‘अटल’ पाया

‘मंदिर वही बनायेंगे’ या घोषणेला विरोधक ‘तारीख नही बतायेंगे’ अशी जोड देत मस्करी करत होते. आता २२ जानेवारी ही तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. अंत्योदय, ग्रामोदय आणि सर्वोदय या तत्वावर सरकार काम करत आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोचला पाहिजे असे अटल बिहारी वाजपेयी म्हणायचे. दीनदयाळ उपाध्याय यांनी अंत्योदय तत्वाची शिकवण दिली. त्याच मार्गाने सरकार मार्गक्रमण करत आहे, असे मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत म्‍हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com