सासष्टी: सद्या सरकारी नोकऱ्या देण्यासंदर्भात भयंकर भ्रष्टाचार चालू आहे. सरकारी नोकऱ्यांसाठी पैशांची मागणी चालू आहे. काही एजन्ट कार्यरत आहेत असे स्वता मुख्यमंत्र्यानी म्हटले आहे. पण नोकऱ्यांसाठी पैसे घेत असलेल्या एजन्टांवर तक्रारी करुनही काहीच कारवाई होत नाही असे गोवा फॉरवर्डचे (Goa Forward) सरचिटणीस दुर्गादास कामत (Durgadas Kamat) व विकास भगत यांनी मडगावी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. काणकोण येथील एका युवकाकडुन सरकारी नोकरीसाठी साखळी येथील एक व्यक्ती रामेश्र्वर मांद्रेकर (Rameshwar Mandrekar) यांनी पाच लाख रुपये घेतले होते. त्या संदर्भात 3 एप्रिल 2021 या दिवशी काणकोण पोलिस चौकीत तक्रार नोंद केली होती. पण मुख्यमंत्र्यांनी या तक्रारीची दखल घेतली नाही व कारवाईही केली नसल्याचे भगत यानी सांगितले.
सद्या सरकारी नोकऱ्यासाठी पावणी सुरु आहे. सरकारी नोकऱ्या योग्यतेवर मिळाल्या पाहिजे. जर कुठल्याही खात्यातील सरकारी अधिकारी राजकीय दबावाखाली योग्यता नसलेल्यांना सरकारी नोकरीत समाविष्ट करुन घेत असतील तर आपल्या पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यावर या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा ईशारा दुर्गादास कामत यानी दिला. भारतीय जनता पक्ष निराश झाला असुन सरकारी नोकऱ्या त्यानी घाऊक बाजारात विक्रीस काढलेल्या आहेत अशी टिकाही कामत यानी केली. पुढील 20-25 दिवसात निवडणुक आचारसंहिता लागू केली जाण्याची शक्यता असल्याने बेकार युवकांनी व त्यांच्या पालकांनी अशा आमिषांना बळी पडू नये असा ईशारा कामत यानी दिला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.