Querim Beach: केरी समुद्रात चार जणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या बातमीने भाजप सरकारचे "मिशन टोटल कमिशन" पुन्हा एकदा उघड झाले आहे. पर्यटन खाते समुद्रकिनाऱ्यांवर येणाऱ्या लोकांच्या सुरक्षेसाठी करोडो रुपये खर्च करते पण दुर्दैवी घटना घडली तेव्हा जीवरक्षक आणि पर्यटक रक्षक कुठे होते? असा सवाल काँग्रेस मीडिया सेलचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे.
पर्यटनमंत्री रोहन खंवटे जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणार का? पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सन्मानार्थ मुख्यमंत्री त्यांचा वाढदिवस सोहळा रद्द करतील का?
डॉ. प्रमोद सावंत यांच्या बेजबाबदार, असंवेदनशील आणि भ्रष्ट भाजप सरकारने निरपराध कुटुंबांना उध्वस्त केले आहे, असा आरोप अमरनाथ पणजीकर यांनी केला.
केरी बीचवरील घटनेने हे सिद्ध झाले आहे की कंत्राटदारांनी समुद्रकिनाऱ्यांवर पुरेसे जीवरक्षक तैनात केले नाहीत, असा दावा अमरनाथ पणजीकर यांनी केला. आमची मागणी आहे की या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी.
समुद्रकिनारा सुरक्षा कंत्राटदाराने गुंतलेले मनुष्यबळ आणि उपकरणे यांचे लेखापरीक्षण करावे. यावरून जनतेच्या पैशाची कशी लूट केली जाते हे सिद्ध होईल, असे अमरनाथ पणजीकर यांनी म्हटलेय.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.