पणजी मी कधीच सोडणार नाही. कोणी कितीही स्वप्ने पाहिली तरी ती पूर्ण होणार नाहीत. माझा पक्षावर विश्वास आहे. ज्यांच्याकडे लोक आहेत, त्यालाच पक्षात किंमत आहे.
लोकमत असेल तरच पक्ष तिकीट देतो आणि माझ्याकडे लोकमत आहे, हे आज पुन्हा सिद्ध झाले आहे, असा दावा पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी केला.
ताळगाव पंचायतीवर बाबूश गटाने आज निर्विवाद वर्चस्व स्थापन केल्यानंतर त्यांनी विजयी जल्लोष केला. 11 पैकी 11 पंचसदस्य त्यांनी निवडून आणले. त्यानंतर 'गोमन्तक" टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.
ते म्हणाले, मी सतत मतदारांच्या संपर्कात असतो. निवडणुकीत मतदार हा सर्वोच्च असतो. निवडणुकीच्या निमित्ताने लोकांना भेटण्याची एक संधी मिळते. कोणतीही समस्या असल्यास मतदारांनी आपल्याकडे यावे.
मंत्रिपद आज आहे उद्या नाही. त्यामुळे जनतेबरोबर राहणे अधिक महत्त्वाचे असते. विकास ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. ताळगाव मार्केटची इमारत करण्याचे आश्वासन दिले होते, ते पूर्ण झाले नाही. परंतु यावेळी काम सुरू होईल.
ताळगावात माझा प्रतिनिधी आहे. मी पुन्हा ताळगावात येणार नाही. मात्र पणजी कधीच सोडणार नाही, असेही बाबूश म्हणले. मी पक्षाबरोबर राहिलो आहे. पक्षविरोधी काम कधीच केलेले नाही, असेही ते म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.